Marmik
Hingoli live क्राईम

जप्त टिप्पर चोरीस गेल्याचे प्रकरण; मालकच निघाला चोर


मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – वसमत येथील उपविभागीय कार्यालय परिसरातून 20 ऑक्टोबर 2023 रोजी अवैध वाळूचे जप्त केलेले टिप्पर चोरी गेल्यासंदर्भाने अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. सदर प्रकरणात टिप्पर मालकच चोर असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी टिप्पर मालकासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून 5 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर टिप्पर चोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि. 25/11/23 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि घेवारे व त्यांचे पथक यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदर टिप्पर मालक श्रीकांत उर्फ शिरू बोकारे (रा. रहाटी ता. जि. नांदेड) यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदर टिप्पर तो स्वतः व त्याच्यासोबत गोविंद बोकारे , राम बोकारे असे मिळून चोरून नेल्याचे सांगितले.

तसेच सदर टिप्पर भंगार दुकानदार खाजा शेख (रा.नांदेड) यांच्या मार्फतिने तोडल्याचे सांगितले. यावरून पोलीस पथकाने सदर टिप्पर चे तुकडे जप्त करून चारही आरोपींना आरोपी बनविले आहे. तसेच पोलीस स्टेशन वसमत येथे 5 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ,अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, आकाश टापरे, गणेश लेकुळे, नरेंद्र साळवे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली आहे.

Related posts

सीईओ संजय दैने यांची दाटेगाव येथे भेट; विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

Gajanan Jogdand

आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणाऱ्या 12 सोशल मीडिया वापरकर्त्यावर कारवाई

Santosh Awchar

शेतकऱ्यांना मिळणार निशुल्क सोयाबीन बियाणे मिनीकिट

Santosh Awchar

Leave a Comment