मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार यांनी 18 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान खरवड येथे धाड टाकून एक घनमीटर सागवान जप्त केले.
हिंगोली येथील कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी सदरील पदाचा कार्यभार घेतल्यानंतर धडाकेबाज कारवाईला सुरुवात केली आहे. त्यांनी दोन ते तीन दिवसांपूर्वीच पातोंडा बीट अंतर्गत येणारे वराडी गाव शिवारातून सहा घनमीटर सागवान व चार रंधा मशीन जप्त केल्या होत्या.
त्यानंतर 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांनी हिंगोली तालुक्यातील खरवड शेत शिवारात विनापरवाना साठवलेले एक घनमीटर सागवान जप्त केले ह्या सागवानची अंदाजे किंमत 35 हजार रुपये एवढी असून गोल नग अंदाजे 35 आहेत.
कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार ह्या करत असलेल्या धडाकेबाज कारवाईने सागवान साठवणूक करणाऱ्या माफियात मोठी खळबळ उडाली असून जिल्ह्यात त्यांच्या या धडाकेबाज कारवाईची मोठी चर्चा होत आहे.
वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार यांनी हिंगोली चा पदभार घेतल्यानंतर दीड ते दोन महिन्यातील त्यांचीही पाचवी कारवाई आहे. तसेच आतापर्यंत त्यांनी 16 घनमीटर सागवान जप्त केले आहे.
ही कारवाई त्यांनी विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या प्रकरणी एका अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय वन अधिनियम 1927 व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियमानुसार प्रथम गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्राधिकारी मीनाक्षी पवार यांनी केलेल्या या कारवाईने त्यांचे विभागीय वन अधिकारी बाळासाहेब कोळगे यांच्यासह वनविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.