मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – सतत गुन्हे करणारी टोळी हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हिट लिस्टवर असून असे गुन्हे करणारे सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील दोघे हिंगोली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहेत.
हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणारा विरुद्ध तसेच टोळीने गुन्हेगारी कृत करणाऱ्या विरुद्ध कठोर कार्यवाहीची भूमिका घेत असे गुन्हे सतत करणाऱ्या विरुद्ध प्रभावी प्रतिबंध कार्यवाही करत आहेत.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आज नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील पुसेगाव येथील सराईत गुन्हेगार लक्ष्मण सुभाष देशमुख (वय 38 वर्ष) प्रवीण सुभाष देशमुख (वय 35 वर्ष) दोन्ही (रा. प्लॉटवाडी, पुसेगाव, तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली) यांच्या विरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध एकूण दोन गुन्हे दाखल असून ते सतत संघटितपणे गुन्हे करतच आहेत.
त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांच्या अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालींमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जीविका धोका उत्पन्न होत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सदर प्रकरणी कठोर प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिले होते.
यावरून नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. बी. नागरे यांनी नमूद आरोपींविरुद्ध कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारचा प्रस्ताव सादर केला होता.
सदर प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी उपविभाग हिंगोली शहर विवेकानंद वाखारे यांनी सविस्तर चौकशी करून नमूद आरोपीच्या टोळीस हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे शिफारस केली.
यावरून नमूद प्रकरणी सविस्तर तपासणी करून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 अन्वय नमूद दोन्ही आरोपींना आज पासून पुढील दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केल्या बाबत आदेश काढले आहेत.
हिंगोलीचे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर हे समाजात शांतता नांदावी म्हणून सराईत गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्याबाबत कोंबिंग व ऑल आउट ऑपरेशन मधून त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांच्या बाबत कठोर प्रतिबंधक कार्यवाही करत आहेत.