Marmik
क्राईम

वृद्ध महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड, चोरटे फुकट कपडे वाटण्याचे करत होते बतावणी

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वृद्ध महिलांना आडोशाला नेऊन त्यांच्या अंगावरील दागिने काढून चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. सदरील चोरट्यांनी चिखली, अकोला, वाशिम येथे एकूण सात गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसात वृद्ध महिलांना हे ऋण गरीब लोकांना वाटत चालू आहे असे सांगून महिलांना आडोशाला नेऊन तुमच्या अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवा जेणेकरून तुम्ही गरीब दिसाल व तुम्हाला फुकट कपडे मिळतील, असे सांगून चोरट्यांनी वृद्ध महिलांची फसवणूक करून अंगावरील दागिने चोरल्या संदर्भात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सदर गुन्हाचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिल्या होत्या यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसंग घेवारे यांचे पथक समांतर तपास करीत होते.

पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की वृद्ध महिलांना फसवून अंगावरील डाग दागिने काढून घेणारे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे जयराम किसन पवार (वय 24 वर्षे, रा. लिंबगाव ता. जि. नांदेड ह. मु. कलमुला ता. पूर्णा जि. परभणी), गणेश दादाराव मोरे (वय २४ वर्षे), प्रतीक दादाराव मोरे (वय 20 वर्षे, दोन्ही रा. पूर्णा रेल्वे स्टेशन परिसर पूर्णा जि. परभणी) हे असून ते विशेषतः मुंबई परिसरात व महाराष्ट्रभर अशा प्रकारचे गुन्हे करत असतात.

आरोपी जयराम किसन पवार हा सध्या त्याच्या मूळ गावी कलमुला येथे आहे, अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने आरोपीस ताब्यात घेऊन हिंगोली शहर पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या दोन गुन्ह्यातील सोन्याचा मुद्देमाल गळ्यातील सोन्याच्या मन्या व कानातील कर्णफुले तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी जयराम पवार याच्यावर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे पोलीस अंमलदार राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आजम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.

Related posts

आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्या एका फेसबुक वापरकर्त्यासह 14 व्हाट्सअप वापरकर्त्यावर कार्यवाही

Santosh Awchar

विशेष कोंबिंग ऑपरेशन: अनेकांची उचल बांगडी!

Santosh Awchar

अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त; स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

Santosh Awchar

Leave a Comment