Marmik
News

वर्दीतील माणुसकीचे घडले दर्शन! अपघातातील जखमींना दवाखान्यात नेऊन वाचविले प्राण!!

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – काही दिवसांपूर्वी खाकीतील माणसे म्हणजे केवळ हप्ते घेण्यासाठी आणि अवैध धंद्यांना जोपासण्यासाठी असल्याचे चित्र हिंगोली जिल्हा भरात होते, मात्र या खाकीतील माणसांनी माणुसकी जपत अपघात ग्रस्त वाहनातून जखमींना सुखरूप बाहेर काढून स्वतःच्या वाहनातून दवाखान्यात हलविले आणि त्यांचे प्राण वाचवले. त्यामुळे पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन व सामान्यांचा बदलला आहे.

हिंगोली जिल्ह्याचे नूतन डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दैनंदिन चोरी व इतर गंभीर गुन्ह्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रभावी रात्रगस्त लावल्या जात आहेत. त्यात प्रत्येक दिवशी एक जिल्हा रात्रगस्त अधिकारी तर तिन्ही पोलीस उपविभागासाठी तीन स्वतंत्र विभागीय रात्रगस्त अधिकारी नेमले जातात.

7 डिसेंबरच्या रात्री 11 वाजता ते 8 डिसेंबर रोजी च्या पहाटे 5 वाजता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांची जिल्हा रात्रगस्त अधिकारी म्हणून कर्तव्यावर होते तर दहशतवाद विरोधी शाखेतील राजेश मलपिल्लू यांची वसमत विभागीय रात्रगस्त अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली होती.

यात पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्यासोबत पोलीस अंमलदार गजानन पोकळे, विठ्ठल काळे, दिनकर बांगर, कुमार मगरे, सोपान थिटे व शेख जावेद यांची नियुक्ती होती तर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्यासोबत पोलीस अंमलदार सचिन गोरले, विजय घुगे यांची नियुक्ती होती.

नमूद अधिकारी व अंमलदार यांनी रात्री दरम्यान पेट्रोलिंग कर्तव्यावर सकाळी हिंगोली कडे परत येत असताना पहाटे 5 वाजून 15 मिनिटाला त्यांना हिंगोली औंढा नागनाथ रोडवरील पिंपरी गावाजवळ रोडच्या डाव्या बाजूला खाली नाल्यात एक आय टेन कार अपघात ग्रस्त होऊन पलटी झाल्याची दिसली. सदर वाहनाचे लाईट लागून होते व त्यातून जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा अशा असे भयग्रस्त आवाज येत होते.

नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ आपले वाहने थांबवून नाल्यात सदर कार जवळ गेले. सदर कार ही अपघातात पूर्णपणे उलट्या स्थितीत व कारच्या काचा व इतर भागाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या स्थितीत होते.

नमूद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ जिद्दीने प्रयत्न करून सदर कारला उचलून बाजूला करत त्यात जखमी अवस्थेत अडकून पडलेल्या दोन इसमांना अलगदपणे कारची खिडकी काढून त्यातून सुखरूप बाहेर काढले. नमूद दोन पैकी एका इसमास गंभीर दुखापत होऊन रक्त निघत होते व ते दोघेही प्रचंड धक्क्यात होते.

पोलिसांनी त्यांना धीर देऊन तात्काळ आपल्या स्वतःच्या पेट्रोलिंग वाहनातून थोडाही उशीर न करता उपचारासाठी सरकारी दवाखान्यात आणून भरती केले व त्यांच्या नातेवाईकांनाही माहिती दिली डॉक्टरांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू केले असून माहिती घेता सदर इसमाचे नावे राम भाग्यवंत व गोपाल खोतकर असे असून ते (रा. वेणी ता. लोणार जि. बुलढाणा) येथील आहेत. ते लोणार ते औंढा नागनाथ कडे जात असल्याची माहिती मिळाली असून नमूद दोन्ही जखमींना त्यांच्या नातेवाईकांनी हिंगोली येथे येऊन पुढील उपचार कामे मेहकर येथील दवाखान्यात भरती केले आहे.

अपघातातील जखमींची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून कळाले आहे.

Related posts

Hingoli पारोळा धबधबा ओसंडून वाहू लागला; पर्यटकांची गर्दी

Santosh Awchar

419 मिसिंग प्रकरणांपैकी 192 प्रकरणे निघाली निकाली; स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राजेश मलपिल्लू यांच्यावर सोपविण्यात आली जबाबदारी

Santosh Awchar

गांधी चौकात काँग्रेसचे आंदोलन; राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

Santosh Awchar

Leave a Comment