मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – छत्रपती संभाजी नगर येथील विभागीय वन अधिकारी कल्पना टेमगिरे यांनी 9 सप्टेंबर रोजी हिंगोली येथे सदिच्छा भेट दिली.
छत्रपती संभाजी नगर येथील कर्तव्यदक्ष विभागीय वन अधिकारी कल्पना टेमगिरे यांनी 9 सप्टेंबर रोजी हिंगोली येथे सदिच्छा भेट दिली. त्या 9 सप्टेंबर रोजी हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे थांबल्या होत्या. सध्या श्रावण महिना सुरू आहे. त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीनागनाथ महाराजांचे दर्शन घेतले.
आज 10 सप्टेंबर रोजी त्या संतश्रेष्ठ श्रीनामदेव महाराजांचे दर्शन घेऊन सेनगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयास भेट देऊन येलदरी – जिंतूर मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाल्या.
दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी विभागीय वन अधिकारी कल्पना टेममगिरे या हिंगोली येथील विभागीय वन अधिकारी कार्यालयास आल्या असता त्यांची मार्मिक महाराष्ट्र समूहाचे मुख्य व्यवस्थापक संतोष अवचार व मुख्य संपादक गजानन जोगदंड यांनी भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी एएसएफएल शिंदे, सेनगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शेळके, हिंगोली वनपरिक्षेत्र कार्यालयातील कर्मचारी सारंग शिंदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय वन अधिकारी कल्पना टेमगिरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळ नागपूरचा अधिकारी पदाचा कार्यभार होता. त्यांनी तो चोखपणे पार पाडला होता. सध्या त्या छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय वन अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.