मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे दहा दिवसीय पर्युषण महापर्व दिनांक ८ सप्टेबर ते १७ सप्टेबर पर्यत मोठया भक्तीभावाने साजरा करण्यात येणार असल्याचे पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी व सचिव प्रकाश अजमेरा यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे. यावेळी विरागसागरजी महाराज यांच्या संघातील आर्यिका विकुंदनश्री माताजी व क्षुल्लिका विजीताश्री माताजी यांच्या सानिध्यात पर्युषण महापर्व साजरा करण्यात येणार आहे.
सर्व प्रथम दि. ८ सप्टेबर रोजी पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहन होउन दहा दिवसीय पर्युषण पर्व सुरुवात होणार आहे. यामध्ये उत्त्तम, क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम, तप, त्याग, अंकिचन्य, ब्रम्हचर्य या दहा धर्मावर माताजीचे दररोज उदबोधन होणार आहे.
पर्युषण पर्व निमीत्त्त दररोज सकाळी मंदिरात ८.३० वाजता बोलीया प्रारंभ होउन भगवंताचा पंचामृत अभिषेक, पुजा प्रवचन, सास्कृतिक कार्यकम, तसेच संध्याकाळी नवयुवक मंडळ व महिला मंडळाच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यकम होणार आहे.
तसेच दुपारी तत्त्वार्थ सुञ ग्रंथाचे वाचन होईल संध्यकाळी ७ वाजता भगवंताची आरती होणार आहे. संपुर्ण पर्युषण पर्व हा नमोकार भक्ती मंडळाच्या साग्र संगीतामध्ये आयोजीत करण्यात आला आहे.
सर्व प्रथम दिनांक ८ सप्टेबर रोजी पंचमेरु स्थापना, दि. ९ सप्टेबर रोजी सुमतीसागरजी महाराज स्मृति दिवस कर्णपुरा मंदिर, दि. १० सप्टेबर रोजी नमोकार व्रत व रविवार व्रत प्रारंभ भगवान सुपार्श्श्वनाथ भगवांतचा गर्भकल्याणक महोत्सव, दि. ११ सप्टेबर रोजी भगवान पुष्पदंत कल्याणक निमीत्त्त निर्वाण लाडु, दि. १२ सप्टेबर रोजी पुष्पांजली व्रत समापन,
दि. १३ सप्टेबर रोजी धुप दशमी पंचमेरâ समाप्ती, दि. १४ सप्टेबर रोजी अनंतव्रत प्रारंभ सुपार्श्श्वसागरजी महाराज स्मृतिदिन, दि. १५ सप्टेबर रोजी कांजीबारस, दि. १६ सप्टेबर रोजी रत्नत्रय व्रत प्रारंभ, दि. १७ सप्टेबर रोजी भगवान वासुपुज्य मोक्षकल्याणक महोत्सव निमीत्त्त निर्वाण लाडु आदी धार्मिक कार्यकम होणार आहे. तसेच दिनांक धुप दशमी व चौदस या दिवशी सकाळी १० वाजता बोलीया प्रारंभ होउन भगवांताचा पंचामृत अभिषेक करण्यात येणार आहे.
तसेच १२ महिन्याच्या अष्ट्रद्रव्याची बोली १५ सप्टेबर रोजी प्रारंभ होईल, दि. १९ सप्टेबर रोजी पाडवा मिलन व क्षमावली कार्यकम, सकाळी ७.३० वाजता अभिषेक, ८ वाजता शोभायात्रा, संध्याकाळी ५.३० वाजता अभिषेक व पाडवा मिलन व क्षमावली चा कार्यकम होइल.
तसेच दि. १८ सप्टेबर रोजी उपवास धारकांचा सामुहिक शाही पारणा व शोभायात्रा सकाळी ८ वाजता प्रारंभ होईल व महाप्रसाद सकाळी १०.३० ते २ पर्यत हिराचंद कस्तुरचंद कासलीवाल प्रांगण आचार्य गुप्तीनंदी गुरâदेव सभागृह येथे संपन्न होईल दि. २२ सप्टेबर २०२४ रोजी सकल जैन समाजाच्या साधु संताच्या सानिध्यात क्षमावली महोत्सव दुपारी २ वाजता मिञ नगर येथील विराग सिंधु प्रांगणात होईल.
समाज बांधवांनी वरील कार्यकमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विश्श्वस्थ मंडळातर्फे करण्यात आले आहे. अशी माहिता प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली