मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – येथील जिल्हा पोलीस दलात माहे – ऑक्टोबर मध्ये विविध विभागात उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडून कौतुकाची थाप देण्यात आली आहे. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी सतत उल्लेखनीय व प्रशासनीय कामगिरी करावी म्हणून प्रत्येक महिन्यात पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या कामगिरी नुसार विविध विभागातून उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरी केलेल्या अधिकारी व अंमलदार यांचा गौरव करण्यात येत आहे.
त्यात माहे – ऑक्टोबर 2023 मध्ये विविध विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी व अंमलदार यांची निवड करण्यात आली आहे.
गुन्हे उघड – यात स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत ग्रामीण डिव्हिजन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी माहे – ऑक्टोबर 2023 मध्ये घरफोडीचे एकूण 3 गुन्हे चोरी चे 4 गुन्हे असे गुन्हे 7 गुन्हे उघड केले. तसेच कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा नुसार 3 आरोपींकडून 3 तलवार जप्त करून कार्यवाही केली. तसेच गुटखा 1 कारवाही केली व कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे दोन कार्यवाही केली.
सदर ग्रामीण डिव्हिजन पथकाने गुन्हे डिटेक्शन विभागात मागील सलग तीन महिन्यापासून प्रथम क्रमांक मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे नमूद महिन्यात गुड डिटेक्शन या विभागात पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, महादू शिंदे, हरिभाऊ गुंजकर, चापोशी प्रशांत वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
गुन्हे निर्गती – यात पोलीस ठाणे औंढा नागनाथ यांनी माहे सप्टेंबर 2023 मध्ये एकूण 15 पैकी 14 गुन्ह्यांची निर्गती केली. त्याची टक्केवारी 93% आहे. गुन्हे निर्गती विभागात औंढा नागनाथ पोलीस ठाणे यांनी माहे ऑक्टोबर 2023 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून नमूद महिन्यात गुन्हे निर्गती या विभागात औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे व पोलीस अंमलदार पंजाबराव थिटे यांची निवड करण्यात आली आहे.
मुद्देमाल निर्गती – यात नरसी नामदेव पोलीस ठाणे यांनी माहे ऑक्टोबर 2023 मध्ये पोलीस ठाण्याला विविध गुन्ह्यात जप्त मुद्देमाला पैकी 100% मुद्देमाल निर्गती केली आहे. म्हणून नमूद महिन्यात मुद्देमाल निर्गती या विभागात नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे व पोलीस अंमलदार इरफान शेख यांची निवड करण्यात आली आहे.
अपराध सिद्धी – यामध्ये औंढा नागनाथ पोलीस ठाणे यांनी माहे ऑक्टोबर 2023 मध्ये त्यांच्या पोलिस ठाणे अंतर्गत न्यायालयातून निकाल लागलेल्या सर्व प्रकारात शिक्षा झाली असून अपराध सिद्धीचे प्रमाण 93% आहे. म्हणून नमूद महिन्यात अपराध सिद्धी या विभागात औंढा नागनाथ पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे व पोलिस अंमलदार गजानन गडदे यांची निवड करण्यात आली आहे.
सीसीटीएनएस डाटा एन्ट्री – यात औंढा नागनाथ पोलीस ठाणे यांनी माहे ऑक्टोबर 2023 मध्ये सीसीटीएनएस मध्ये डाटा एन्ट्री प्रकारात गुन्ह्यातील कागदपत्र जलदगतीने व यशस्वीरित्या भरले. त्याचे प्रमाण 71 टक्के आहे. म्हणून नमूद महिन्यात अपराध सिद्धी या विभागात औंढा नागनाथ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे अंमलदार तायडे, ढाकरे, माजिद यांची निवड करण्यात आली आहे.
समन्स वॉरंट बजावणी – यात नरसी नामदेव पोलीस ठाणे यांनी माहे ऑक्टोबर 2023 मध्ये समन्स बजावणी यात अजामीनपात्र वॉरंट बजावणी 100%, जामीन पात्र वॉरंट बजावणी 100%, समन्स 100% बजावणी केली. म्हणून नमूद महिन्यात समन्स वॉरंट बजावणी या विभागात नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे व पोलीस अंमलदार शिरफुले यांची निवड करण्यात आली आहे.
मालमत्ता हस्तगत – यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माहे ऑक्टोबर 2023 मध्ये जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमाला पैकी 2 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. म्हणून नमूद महिन्यात मालमत्ता हस्तगत या विभागात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाहुळे, ज्ञानेश्वर पायघन, विठ्ठल काळे, महादू शिंदे, हरिभाऊ गुंजकर, चापोना प्रशांत वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
प्रतिबंधक कार्यवाही – यात गुन्हेगारांना प्रतिबंध व्हावा व गुन्हेगारांवर वचक राहावी म्हणून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी माहे ऑक्टोबर 2023 मध्ये प्रतिबंधक कार्यवाही 77% केली. म्हणून नमूद महिन्यात प्रतिबंधक कार्यवाही या विभागात हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपडे यांची निवड करण्यात आली आहे.
वरील प्रमाणे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलात विविध विभागात उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांची विभागनिहाय निवड करण्यात आली आहे. त्यांचे छायाचित्र असलेले बॅनर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सर्व अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.