मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेल विभागात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारास 5 हजार रुपयांची लाच स्वीकारली सदरील रक्कम फोन पे द्वारे देण्यात आली. याबाबत तक्रारदार यांना आपल्याकडून घेतलेली रक्कम ही लाज असल्याची खात्री झाल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई महासंचालक यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. सदरील तक्रारी अर्जाच्या चौकशी अहवालावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून लाच घेणाऱ्या पोलीस अंमलदारास अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
हिंगोली तालुक्यातील बोरी शिकारी येथील तक्रारदार यांना हिंगोली ते सायाळा गावाकडे जात असताना गारमाळ उड्डाण पुलाजवळ एक मोबाईल सापडला होता तो मोबाईल तक्रारदार हे त्यांच्या मेहुणे यांच्या नावाने असलेले सिमकार्ड टाकून वापरत होते.
दरम्यान 22 एप्रिल 2023 रोजी तक्रारदार यांना सायबर सेल हिंगोली येथून आरोपी लोकसेवक दीपक हरिदास पाटील (वय 36 वर्ष, पद पोलीस अंमलदार, नेमणूक सायबर सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली, रा. रामा कृष्णा सिटी बळसोंड तालुका जिल्हा हिंगोली) यांनी सापडलेला मोबाईल घेऊन सायबर सेल हिंगोली येथे बोलावले.
त्यानंतर तक्रारदार हे सदर मोबाईल घेऊन आरोपी लोकसेवक यांच्याकडे गेले असता, आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना सापडलेला मोबाईल जमा करण्यास सांगितले.
तक्रारदार हे सदरचा मोबाइल गैर पद्धतीने वापरत असल्याचे सांगुन त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी व गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम 20 हजार रुपयाची लाचेची मागणी केली व तडजोडी अंती 5000/- रुपये घेण्याचे मान्य केले.
त्याप्रमाणे दि. 22/04/2023 रोजी 11:56 वाजण्याच्या सुमारास आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडून फोन पे द्वारे 5000/- रु. लाचेची रक्कम स्विकारली.
सदर बाबत तक्रारदार यांना आपल्याकडून घेतलेली रक्कम ही लाच असल्याची खात्री झाल्याने त्यांनी महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, म.रा. मुंबई यांच्याकडे तक्रारी अर्ज केला होता.
सदर तक्रारी अर्जाच्या चौकशी अहवालावरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपी लोकसेवक यांना अटक करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरील कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेड पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हिंगोली पोलीस उपाधीक्षक अनिल कटके व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक प्रफुल्ल अंकुशकर यांनी केली.