मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-
हिंगोली – येथे कोळ्यांची एक दुर्मिळ प्रजाती आढळली आहे. ‘कॉस्मोफेसिस’ असे तिचे शास्त्रीय नाव असून ती प्रामुख्याने आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये आढळते, अशी माहिती हिंगोली येथील जैवविविधतेचे अभ्यासक विकास कांबळे यांनी दिली आहे.
‘कॉस्मोफेसिस’ ही ‘साल्टिसिडे’ कुटुंबातील कोळ्यांची एक प्रजाती आहे. ते प्रामुख्याने दक्षिणपूर्व आशियाई आहेत, तर काही प्रजाती आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. जरी बहुतेक प्रजाती कमी-अधिक प्रमाणात मुंग्यांची नक्कल करतात.
परंतु अशा रंगीबेरंगी प्रजाती देखील आहेत ज्या वेगळ्या धोरणाचे अनुसरण करतात, अशी माहिती हिंगोली येथील जैवविविधतेचे अभ्यासक विकास कांबळे यांनी दिली आहे.
सदरील ‘कॉस्मोफेसिस’ हिंगोली शहरातील एनटीसी भागात आढळून आले आहे. सदरील जीव हा दुर्मिळ असून भारतात त्याचे वास्तव्य नगण्य असल्याची माहिती मिळतेय.