Marmik
क्राईम

जिल्हा पोलिसांचे एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात विशेष कोंबिंग ऑपरेशन; अनेकांची धरपकड

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – येथील पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांकडून 27 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून 28 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन दरम्यान अनेकांची धरपकड करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली.

हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून-छपून चालणाऱ्या अवैध धंद्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आणि चोरी जबरी, चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणी व त्यांच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कार्यवाही सुरू केले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही फरार व पाहिजे तसेच न्यायालयाच्या वॉरंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात 27 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजेपासून 28 डिसेंबर रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले.

या मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिपान शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक पाडळकर, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे,

पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल काचमांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे तसेच

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने व सर्वच पोलीस ठाण्यामधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

सदर मोहिमेत जिल्ह्यातील एकूण 30 ठिकाणी जेथे रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडून गुन्हेगार तपासणी करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचीही तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाणे अंतर्गत महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

तसेच सदर मोहिमेत हिंगोली शहर पोलीस ठाणे व वसमत शहर पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा 4/25 अन्वय दोन गुन्हे दाखल करण्यात आले.

या मोहिमेत न्यायालयाकडून वेळोवेळी समंस निघूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांच्या बाबत न्यायालयाकडून अटक वॉरंट निघाले होते, अशा एकूण 11 अटकवारंट तामील करण्यात आले.

हद्दपारीचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात हजार मिळून आल्याने दोन व्यक्तीविरुद्ध हिंगोली ग्रामीण व वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 142 मपोका अन्वय दोन कार्यवाही करण्यात आली तर अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या मिळून आलेल्या व्यक्तीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाणे, कळमनुरी, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे, औंढा नागनाथ, वसमत शहर पोलीस ठाणे व आखाडा बाळापूर येथे एकूण 7 व्यक्तीविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायदा, एकूण दोन व्यक्तीविरुद्ध कलम 124 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच सेनगाव पोलीस ठाणे हद्दीत दोन अवैध दारू विक्री विरोधात कार्यवाही करण्यात आली.

Related posts

ज्या शाळेत शिकले तिथेच केली चोरी! शेतकऱ्यांचे मोटार पंप व शाळेतील साहित्य चोरणारी टोळी जेरबंद; 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

वर्कशॉप, शेतातील मोटार व इतर साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Santosh Awchar

हिंगोली पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; तडीपरीचे आदेश झुगारून वावरणाऱ्या दोघांना पकडले

Santosh Awchar

Leave a Comment