मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – सीबीएससी पॅटर्न च्या नावाखाली पालकांकडून पैशांची मागणी करून त्यांची लूट करणाऱ्या सेनगाव येथील तोषनीवाल महाविद्यालयाच्या चौकशीसाठी महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या वतीने हिंगोली प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सेनगाव येथील श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तोषनीवाल महाविद्यालयाने विद्यापीठ अनुदान आयोगा च्या प्राप्त निधीतून मुलींचे वसतिगृह बांधले मात्र सदरील वस्तीगृहात इंग्लिश स्कूल सुरू केली आहे. ये आर टी एम या नावाने सुरु करण्यात आलेल्या या इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून सीबीएससी पॅटर्न च्या नावाखाली तसेच सीबीएससी पॅटर्नची मान्यता नसताना पालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क घेतले जात आहे.
सीबीएससी च्या नावाखाली महाविद्यालयाकडून पालकांची आर्थिक फसवणूक केली जात असून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात आहे. शिक्षण विभागाच्या डोळ्यात धूळफेक केली जात असून केवळ पैसा कमावणे हाच या शाळेचा उद्देश असल्याचे दिसते.
covid-19 काळापासून पालकांची लूट केली जात असून या शाळेवर तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच या भ्रष्ट महाविद्यालयाच्या पैसेखाऊ पॅटर्नची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांनी हिंगोली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना तसेच शिक्षण उपसंचालक यांना निवेदन दिले आहे.