मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क/ संतोष अवचार :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या दांडेगाव येथील महादेव मंदिराची आहे हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने पकडून गजाआड केला आहे. रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुल्ह्यांना आळा घालून सदर गुन्हे करणारे आरोपी व त्यांच्या टोळीला पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेस आदेश देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.
कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील मंदिरात दानपेटी फोडून पैसे चोरीला गेल्या संदर्भाने आखाडा बाळापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा चे पथक समांतर तपास करीत होते.
29 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, दांडेगाव येथील मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केलेला आरोपीचे नाव चांदु शामराव कराळे (रा. नवी आबादी दांडेगाव) हा असून तो सध्या दांडेगाव परिसरात आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली.
यावरून पोलीस पथक संशयित आरोपीस ताब्यात घेऊन विचारपूस करत असता त्याने दांडेगाव येथील मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरल्याचे कबूल करून चोरलेल्या रकमेपैकी 10 हजार 512 रुपये काढून दिले. आरोपीस आखाडा बाळापूर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.
ही कारवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक चोपडे, पोलीस आमदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, तुषार ठाकरे, राजेश घोंगडे यांनी केली.