मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी अभिनव गोयल गुरुवारी (दि. 29) रोजी रुजू झाले आहेत. त्यांनी प्रभारी तथा अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आयआयटी कानपूर येथून सिव्हील इंजिनिअरची पदवी घेतली आहे. ते सन 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आदिवासी विकास प्रकल्प विभागात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले आहे.
तसेच त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.