Marmik
News क्राईम

नांदेड जिल्ह्यातून हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यात सराईत गुन्हे करणारा आरोपी एक वर्षासाठी स्थानबद्ध; पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांचा दणका! एम पी डी ए अंतर्गत जिल्ह्यातील 6वी कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – नांदेड जिल्ह्यात राहून हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यात सतत सराईत गुन्हे करणाऱ्या आरोपी हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी चांगलाच दणका दिला आहे. सदरील आरोपीस एमपीडीए कायद्यान्वय एका वर्षासाठी स्थानबद्धते चे आदेश काढले आहेत. एम पी डी ए कायद्याअंतर्गत केलेली ही जिल्ह्यातील सहावी कार्यवाही आहे.

मांगीलाल पि. श्रीरंग राठोड (वय 40 वर्ष रा. गणेशवाडी हिमायतनगर तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड) असे आरोपीचे नाव असून तो नांदेड जिल्ह्यात राहून इतर आरोपींना सोबत घेऊन यवतमाळ व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात व सतत चोरी, घरफोडी, दुखापत करून जबरी चोरीचे गुन्हे व दरोडाचे गुन्हे केलेले आहेत.

त्याच्याविरुद्ध हिंगोली जिल्ह्यात वसमत ग्रामीण पोलीस ठाणे व आखाडाबाळापुर येथे गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल असून अशाच स्वरूपाचे यवतमाळ जिल्ह्यात 6 असे एकूण 12 शरीराविरुद्धचे व मालमत्ता विरुद्ध चे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो अशा प्रकारचे सतत गंभीर गुन्हे करत असल्याने समाजासाठी धोकादायक बनला होता.

त्याच्या कृत्यामुळे परिसरातील ग्रामस्थांत भीती व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. तो गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे करीत असल्याने समाज स्वास्थ्यास व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा पोहोचविणारा धोकादायक किसन ठरला होता.

म्हणून पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने सदर प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक वसमत ग्रामीण पोलीस ठाणे यांनी नमूद इसमाविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टी वाले, औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कालवकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेट्रस वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृतींना आळा घालण्या घालण्याबाबत अधिनियम 1981 (एम पी डी ए) अंतर्गत कार्यवाही बाबत प्रस्ताव सादर केला होता.

सदर प्रस्तावाचे तपासणी वसमत प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वसमत यांनी केली हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सदरचा प्रस्ताव हिंगोली जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सदर प्रस्तावाची संपूर्ण सविस्तर पडताळणी करून नमूद इसम नामे मांगीलाल पि. श्रीरंग राठोड (वय 40 वर्ष रा. गणेशवाडी, हिमायतनगर तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड) हा एक सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक ठरून धोकादायक व्यक्ती बनल्याने त्यास एम पी डी ए कायदा 1981 (सुधारणा 1996, 2009 आणि 2015) कलम 3(1) अन्वय एका वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले आहेत.

Related posts

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा: अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, तरप्रख्यात गायक सुदेश भोसले यांचा कंठसंगीतासाठी सन्मान, रोहिणी हट्टंगडी यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान

Gajanan Jogdand

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉल्या चोरणारा आरोपी जेरबंद, 8 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी केले स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन

Santosh Awchar

27 लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक फिर्यादीस केला परत

Santosh Awchar

Leave a Comment