मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील जांभरुण येथील फिर्यादीच्या घरी दिवसा घरफोडी करून सोन्या, चांदीचे दागिने व नगदी रक्कम असा एकूण 72 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे. प्रकरणातील आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे सदरील घरफोडी च्या प्रकरणातील आरोपीस अवघ्या चार तासात गजाआड करण्यात आले आहे.
16 ऑक्टोबर रोजी नरसी नामदेव पोलीस ठाणे हद्दीतील जांभरुण रोडगे येथील फिर्यादी फुलाजी लक्ष्मण रोडगे हे परिवारासह घराला कुलूप लावून शेतात गेले होते.
या संधीचा फायदा घेत अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्यातून घरात येऊन घरातील डब्यात ठेवलेले सोन्या – चांदीचे दागिने व नगदी रुपये असा एकूण 72 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
याबाबत 17 ऑक्टोबर रोजी फिर्यादी फुलाजी रोडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध नरसी नामदेव पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा तात्काळ उघड करून पुण्यातील आरोपी पकडून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश देऊन मार्गदर्शन केले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू आणि त्यांच्या तपास पथकाने तात्काळ नमूद
घटनास्थळी व परिसरात भेट देऊन जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून अवघ्या चार तासात हा गुन्हा गणेश शंकर रोडगे (वय 25 वर्षे, रा. जांभरून ता. सेनगाव जि. हिंगोली) याने केल्याबाबत निष्पन्न केले. नमूद आरोपीस तात्काळ सीताफिने ताब्यात घेऊन विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
तपासात आरोपीकडून गुन्ह्यात चोरून नेलेले दागिने व नगदी रक्कम जप्त करण्यात आले. यावेळी आरोपीकडून 40 हजार रुपयांची
(एक तोळा सोन्याची एक दानी), 7 हजार रुपये सोन्याचे 8 कांडेमणी (दीड ग्रॅम वजनाचे), पाच हजार रुपये सोन्याचे 16 पोखर मनी (एक ग्रॅम वजनाचे), 2800 रुपये चांदीचे चार जोडवे (चार तोळे वजनाचे), 1400 रुपये चांदीचे दोन बिचवे
(दोन तोळे वजनाचे), 300 रुपये चांदीची एक अंगठी (अडीच ग्रॅम वजनाची), 16 हजार 300 रुपये नगदी रुपये ज्यामध्ये 500 रुपये व 100 रुपयांच्या नोटा असा चोरून नेलेले सोन्या-चांदीचे दागिने व नगदी असा ऐकून 72 हजार 800 रुपये गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कार्यवाही हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वावळे, विठ्ठल काळे, महादू शिंदे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे दीपक पाटील यांनी केली.