मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वसमत व हिंगोली शहरात सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या व टवाळखोर अशा एकूण वीस जणांवर हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने प्रतिबंधात्मक कार्यवाही केली आहे.
हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर विशेष भर देऊन शाळा महाविद्यालय तसेच शिकवणी वसतिगृह या ठिकाणी तसेच शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ परिसर व धार्मिक स्थळे तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी मुली व महिला तसेच बालकांबाबत होणारे छेडछाडीच्या घटना यांना आळा घालण्यासाठी तसेच सदर परिसरात मुली महिला व बालक यांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे.
सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस शिपाई प्रकाश कांबळे, महिला पोलिस अंमलदार आरती साळवे, अर्चना नखाते, शेख सलमा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
सदरील दामिनी पथकाने 16 ते 22 जानेवारी या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरातील महत्त्वाच्या एकूण 43 ठिकाणी भेटी दिल्या.
नमूद परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणारे व टवाळखोर अशा 15 इसमानवर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली.
तसेच नमूद आठवड्यात 18 जानेवारी रोजी दामिनी पथकाने वसमत शहरात शाळा, महाविद्यालय, बस स्थानक व इतर ठिकाणी पेट्रोलिंग करून सदरील ठिकाणच्या विद्यार्थी व नागरिकांसोबत संवाद साधून परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणारे व टवाळखोर अशा एकूण पाच इसमानवर 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली आहे.
तसेच दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइन 8007000493 ची सेवा ही सुरू करून त्याचा प्रसार केला आहे.