मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – चोरी, घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केली आहे. सदरील टोळीतील अटक करण्यात आलेल्या दोघांकडे तपास केला असता हिंगोली जिल्ह्यातील चार गुन्हे केल्याचे उघडकीस झाले आहे. टोळीतील दोन आरोपींना अटक एक लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात घडणाऱ्या चोरीच्या घटना व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे आदेश देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यांचा घटनास्थळ व परिसराचा व असे गुन्हे करणाऱ्या आरोपीं बद्दल गोपनीय रित्या माहिती घेऊन व तंत्रशुद्ध तपास पद्धतीने असे गुन्हे करणाऱ्या आरोग्य बाबत माहिती घेतली असता परभणी येथील शेख कयूम शेख रफीक (वय 20 वर्ष), शेख रहीम उर्फ शेरा शेख चांद (वय 24 वर्षे) (दोन्ही रा. दर्गाह रोड कुर्बानी शाहनगर परभणी) यांनी हिंगोली जिल्ह्यात व इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना त्यांच्या राहत्या घरून शिताफिने ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याची ची व हिंगोली जिल्ह्यातील चार गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून तपासादरम्यान नमूद गुन्ह्यातील सोन्याचे दागिने ज्यात झुंबर, कानातील बाळी, अंगठी, ओम व चांदीचे कडे असे सोन्या चांदीचे दागिने एकूण किंमत 1 लाख 11 हजार 200 रुपये व नगदी 55 हजार रुपये असा एकूण एक लाख 66 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी विचारपूस दरम्यान हिंगोली जिल्ह्यासह परभणी, चाळीसगाव, आष्टी, कर्नाटक मधील बिदर, औरंगाबाद येथील हरसुल येथे देखील अशाच प्रकारचे चोरी घरफोडीचे गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कारवाई हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार भगवान आडे, किशोर कातकडे, किशोर सावंत, आकाश टापरे, विठ्ठल काळे, नितीन गोरे, ज्ञानेश्वर साळवे, तुषार ठाकरे, शेख जावेद सर्व स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांनी केली.