Marmik
News क्राईम

हिंगोली येथे 10 टवाळखोरांवर दामिनी पथकाची कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरातील सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या 10 टवाळखोरांवर हिंगोलीचे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने कारवाई केली आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस व जनता सुसंवाद वाढविण्यावर व विशेष करून शाळा महाविद्यालय तसेच शिकवणी व वस्तीगृह या ठिकाणी तसेच शहरातील बस स्थानक, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ परिसर व धार्मिक स्थळे तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी मुली व महिला तसेच बालकांबाबत होणारे छेडछाडीचे प्रकार यांना आळा घालण्यासाठी तसेच सदर परिसरात मुली महिला व बालक यांना सुरक्षितता वाटावी म्हणून दामिनी पथकास विशेष सूचना देऊन कार्यरत केले आहे.

सदर पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस शिपाई प्रकाश कांबळे, महिला पोलीस अंमलदार आरती साळवे अर्चना नखाते, शेख सलमा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सदरील दामिनी पथकाने 22 ते 29 जानेवारी या दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनात हिंगोली शहरातील एकूण 40 ठिकाणी भेटी दिल्या.

नमूद परिसरात सार्वजनिक शांतता भंग करणारे वटवाळखोर अशा एकूण 10 इसमावर कलम 110 / 117 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वय प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही केली.

तसेच दामिनी पथकाने अडचणीच्या वेळी तात्काळ मदतीसाठी हेल्पलाइनची (8007000493) सेवा सुद्धा सुरू करून त्याचा प्रसार केला आहे.

Related posts

अंतरवाली सराटी लाठी चार्ज प्रकरण: सेनगाव बंद, तर मराठा क्रांती मोर्चा कडून 4 सप्टेंबर रोजी जिल्हा बंदची हाक, काही संघटनांचे पदाधिकारी नजर कैदेत

Gajanan Jogdand

सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तिघांवर दामिनी पथकाची कारवाई

Santosh Awchar

सेनगाव येथून दोघे दोन वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार

Santosh Awchar

Leave a Comment