Marmik
Hingoli live

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची सेनगाव येथे कारवाई; 9 हजार 250 रुपयाचा दंड वसूल

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासकीय कार्यालये व शाळांचा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणे तंबाखू मुक्त करण्याचे निर्देश दिले  आहेत. त्यानुसार आज दि. 10 जानेवारी, 2023 रोजी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्या सुचने नुसार जिल्हा तंबाखू नियंत्रण पथक व सेनगाव पोलीस द्वारे सेनगाव येथे टी- पॉईंट परिसरातील तंबाखू विक्री केंद्र तसेच प्रशासकीय इमारत सेनगाव येथे कर्तव्यावर असतांना तंबाखूचे सेवन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर धाडी टाकून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.

तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003) नुसार सर्व सार्वजनिक परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ खाणे, थुंकणे व विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.

सेनगाव येथे टि-पॉईंट परिसरात या कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकांना माहिती मिळाली.

त्यानुसार सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांच्या सहकार्याने सहा. पोलीस निरीक्षक दिक्षा लोकडे, पोलीस अंमलदार महादेव शिंदे, जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकातील मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे विभागीय अधिकारी अभिजित संघई, डॉ. मयूर निंबाळकर, आनंद साळवे, कुलदीप केळकर व इतर कर्मचारी यांच्या पथकाने  परिसरातील ठिकठिकाणी उल्लंघन करणाऱ्या तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही केली.

या कार्यवाहीत एकूण 22 लोकांकडून 9 हजार 250 रुपये दंड वसूल करण्यात आला.

तंबाखू विरोधी कायदा (कोटपा-2003)कलम 4 –

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी आहे.कलम 5 – तंबाखूयुक्त पदार्थ जाहिरात बंदीकलम 6 – ‘अ’  18 वर्षा खालील मुलांना तंबाखूयुक्त पदार्थ विकण्यास सक्त मनाई.कलम 6 ‘ब’  शै. संस्थांच्या 100 मी. परिसरात तंबाखूयुक्त पदार्थ विक्री, सेवन बंदीकलम 7 – कोणत्याही तंबाखूयुक्त पदार्थावर (पाकिटावर) कर्करोगविषयी चेतावणी पाकिटाच्या 85 टक्के भागावर असावी.

Related posts

मर्यादेपेक्षा जास्त आवाज वाढविल्यास डीजे वर होणार कारवाई

Santosh Awchar

स्वच्छता ठेवा अन्यथा कारवाई; अन्न व्यवसायिकांची होणार तपासणी

Santosh Awchar

प्रवासी निवाऱ्यासाठी विद्यार्थिनींचे अमर उपोषण! उपोषणाला कुरुंदा ग्रामस्थांचा पाठिंबा

Santosh Awchar

Leave a Comment