मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीवर विशेष मोहीम राबवून अवैध दारू विक्रीचे समुळ उच्चाटन करण्याबाबत हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यवाही करीत आहे.
4 जुलै रोजी गोरेगाव हद्दीतील चोंडी जवळ धाबा चालक दिनेश अंभोरे यांनी स्वतःच्या धाब्यावर संजय श्रावण धवसे यांच्या मार्फतीने दारू विक्री करीत आहे, अशी माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी छापा मारून दारूचा गुप्ता चालवणारा दारू विकणारा दारू पिणारा व दुकान मालक यांच्यावर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुसऱ्या कार्यवाही मध्ये सेनगाव हद्दीतील मौजे वटकळी येथे तानाजी किशन हनवते व भारत हनवते यांच्यावर दारू विक्री व पार्सल बाबत कार्यवाही करण्यात आली.
तसेच हिंगोली ग्रामीण हद्दीमध्ये मध्ये वैजनाथ मुखाडे (रा. संतुक पिंपरी) यांच्यावर दारू विक्री बाबत कार्यवाही करण्यात आली आहे.
तीनही कार्यवाही मध्ये 165 देशी दारूचे बॉटलसह एकूण 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस आमलदार गजानन पोकळे, लिंबाजी वाव्हळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघन, हरिभाऊ गुंजकर, निरंजन नलावार, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली आहे.