मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – महासंचालक कार्यालयाकडून अवैध देशी व विदेशी दारू हातभट्टी या विरोधात कार्यवाहीसाठी विशेष मोहीम सुरू आहे.
22 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील खांबाळा गावाजवळ रोडवर एका स्कुटीवर अवैधरित्या विक्रीकरिता घेऊन जाणाऱ्या देशी दारू संत्रा भिंगरी च्या पाच बॉक्स एकूण 180 एम एल च्या 240 बॉटल (ज्याची किंमत 19 हजार 200 रुपये) स्कुटी (किंमत 35 हजार रुपये) असा एकूण 54 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल रक्त करून इसम नामे अरबाज सुभान पठाण (वय 19 वर्षे रा. तलाबकट्टा हिंगोली) यांच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भादविसह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीजी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार धनंजय पुजारी, अर्जुन पडघन, विजय घुगे, महेश बंडे यांनी केली.