मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – मानवी व प्राणी जीविकास अपायकारक असलेला नायलॉन / प्लास्टिक सिंतेटिक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी विक्री करणारे तसेच साठा करणारे दुकानदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. मकर संक्राती चा सण जस जसा जवळ येतोय तसं तसे पतंग उडविण्यासाठी मांजा मांजाची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते.
नायलॉन / प्लास्टिक सिंथेटिक धाग्यापासून बनविलेल्या मांजामुळे मानवी व प्राणी जीविका मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारे मानवी व प्राणी जीविकास अपायकारक असलेला नायलॉन प्लास्टिक सिंथेटिक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी विक्री करणारे, साठा करणारे दुकानदार, त्याची निर्मिती अथवा पुरवठा करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व 13 पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
अशा इसमा बाबत काही माहिती असल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास 112 या क्रमांकावर तसेच पुढील नमूद पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे.
हिंगोली शहर पोलीस ठाणे, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक आर. एन. मळगणे – 9667706677, बासंबा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक व्हि.डी. श्रीमनवार – 7745899222, कळमनुरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे – 9552515321, सेनगाव पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे – 8308278899, औंढा नागनाथ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे – 8767312795, वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम – 7083552233, आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड – 9552672323, नरसी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. पी. नागरे – 9921210500, गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एच. हुंडेकर – 8888867757, हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोराटे – 8668383731, कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे – 9595851585, वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी – 9850807207 या पथकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुकानदारांना आवाहन
मकर संक्रात सणानिमित्त सर्व पतंग विक्री करणारे दुकानदार व पुरवठादार अशा कोणीही पर्यावरणास अपायकारक असलेल्या नायलॉन मांजाची विक्री पुरवठा वाहतूक करू नये असे आवाहन करत नायलॉन मांजाची विक्री, पुरवठा, वाहतूक करताना आढळून आल्यास संबंधित दुकानदार व पुरवठादार यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.