Marmik
Hingoli live Love हिंगोली

मर्यादेपेक्षा जास्त आवाज वाढविल्यास डीजे वर होणार कारवाई

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – लग्न अथवा इतर कोणत्याही समारंभात डीजेचा आवाज घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वाढवल्यास संबंधित डीजे चालक व मालकावर प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जाणार आहे.

ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार ध्वनिक्षपक वापराबाबत निश्चित डेसिबलची (आवाज) मर्यादा ठरवून दिलेली आहे. सर्व नागरिकांनी नमूद ध्वनी प्रदूषण अधिनियम 2000 सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचना यांचे ध्वनिक्षपक वापरताना तंतोतंत पालन करावे.

यापुढे कोणताही सण – उत्सव, धार्मिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ व इतर प्रसंगी मर्यादेच्या पलीकडे आवाज असणारे ध्वनिक्षपक विजेचा कोणीही वापर करू नये.

जिल्हा पोलीस दलाकडून वेळोवेळी याबाबत तपासणी करण्यात येणार असून मर्यादित आवाजापेक्षा अधिक आवाज करणारे ध्वनिक्षपक (डीजे)वर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

डीजे लावून कार्यक्रम घेणारे आयोजक तसेच डीजे चा मालक यांच्याविरुद्ध विविध कायदा व कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येणार असून अशा मर्यादेपेक्षा अधिक आवाज असणारे डीजेचे सर्व साहित्यही जप्त केले जाणार आहेत.

Related posts

वसमत येथील शुक्रवार पेठेतून 5 किलो गांजा जप्त

Santosh Awchar

हिंगोली ग्रामीण, शहर व कुरुंदा पोलीस ठाणे टॉप – 3 मध्ये; पोलीस अधीक्षक यांच्याकडून प्रशस्तीपत्रक जाहीर

Santosh Awchar

वातावरण बदल: शीत लहरींनी हिंगोलीकर गारठले!

Gajanan Jogdand

Leave a Comment