Marmik
क्राईम

घरफोडीतील अट्टल चोरटे जेरबंद; आरोपींवर पंधरा वर्षांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – शहरातील एनटीसी भागात बंद घराचे कुलूप तोडून चोरी करणारे तसेच मागील पंधरा वर्षापासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले अट्टल बहादर चोरटे हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडून जेरबंद केले आहेत. यावेळी या चोरट्याकडून 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात होणारे मालाविरूध्दचे गुन्हे उघड करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना वेळोवेळी सुचना देवुन मार्गदर्शन करीत असतात. त्याअनुषंगाने हिंगोली शहरात दि. २४/०१/२०२४ रोजी पहाटे एन.टि. सी. परिसरामध्ये बंद घराचे कुलूप तोडुन चोरी झाल्या संदर्भाने दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सुध्दा सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माहिती घेत होते.

दि. ३१/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, एन.टि.सी. परिसरामध्ये बंद घराचे कुलूप तोडुन चोरी केलेले चोरटे नामे दिनेश उर्फ दिन्या गणपत काळे व बालाजी उर्फ बाल्या गणपत काळे (रा. खरबी, ता. जि. हिंगोली) व त्यांचे इतर काही साथीदार असुन ते सध्या इंदिरानगर, हिंगोली भागात आहेत, अशी माहिती मिळाली.

यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर चोरटयांना ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन विचारपुस केली असता दोन्ही आरोपींनी एन.टि.सी. परिसरात दि. २४/०१/२०२४ रोजी रात्री बंद घर फोडले असुन आमच्या सोबत आमचा सख्खा भाऊ अनिल उर्फ अन्या गणपत काळे व त्याच्या ओळखीचे इतर इसम होते. त्यांच्या दोघांच्या हिश्याला आलेले सोन्याचे दागीने (किंमती ६४ हजार रुपये) काढुन दिले. त्यांना ताब्यात घेवुन, पो.स्टे. हिंगोली शहर गुरनं. ४७/२०२४ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि हा गुन्हा उघड करून, त्यांना हिंगोली शहर पोलीस ठाण्यात

हजर केले आहे. सदर आरोपीवर मागील पंधरा वर्षातील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे गंभीर स्वरूपाचे हिंगोली व आजुबाजुच्या जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीतांकडुन आणी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

सदरची कार्यवाही हिंगोली पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार राजु ठाकुर, नितीन गोरे, आकाश टापरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांचे पथकाने केली.

Related posts

हिंगोली येथे 10 टवाळखोरांवर दामिनी पथकाची कारवाई

Gajanan Jogdand

11 instagram वापरकर्त्यांचे अकाउंट बंद! सायबर सेल ची कारवाई

Santosh Awchar

52 ताश पत्त्यावर चालणाऱ्या झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर कळमनुरी पोलिसांची धडक कारवाई, 3 लाख 86 हजार 440 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Santosh Awchar

Leave a Comment