मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – तब्बल दोन वर्षानंतर हिंगोली चा पोळा मोठ्या उत्साहात व हर्ष उल्हासात साजरा झाला.
हिंगोली येथील मंगळवार भागात असलेल्या पोळा मारुती येथे मोठ्या उत्साहाने व आनंदाच्या वातावरणात पोळा सण दरवर्षी पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.
शेतकरी आपल्या लाडक्या सर्जा – राजा बैल जोडीची पूजाअर्चा केल्यानंतर बैलांना फेरे मारण्यासाठी येथे घेऊन येतात. 26 ऑगस्ट शुक्रवार रोजी येथे दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा पारंपारिक पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणात बैलपोळा साजरा करण्यात आला.
covid-19 चा प्रादुर्भावाने दोन वर्षे कोणताही सण व उत्सव सार्वजनिक रित्या साजरा करण्यात आला नव्हता. दोन वर्षानंतर बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी बैलांना ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत फिरविण्यात आले. तसेच मानाच्या जागृत पोळा मारुती मंदिरास फेरे मारण्यात आले. बैलपोळा फुटल्यानंतर बैलांना घरोघरी नैवेद्य दाखविण्यात आला.
यावेळी मानकरीसह, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर, भावी नगराध्यक्ष श्रीराम बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष दिलीप भाऊ चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.