मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
छत्रपती संभाजीनगर – जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे अकरावे आचार्य श्री महाश्रमण यांचे 81 साधुसंतांसह मंगळवारी सात रोजी गोलवाडीत आगमन होणार आहे. आचार्य संघाच्या मार्गदर्शनाखाली 11 मे पर्यंत शहरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आचार्यश्री महाश्रमण अक्षय तृतीया प्रवास व्यवस्था समितीचे अध्यक्ष सुभाष नहार यांनी हॉटेल गिरनार येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. अनिल नहार, सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जैन शेतांबर तेरापंथ धर्म संघाचे नवे आचार्य तुलसी हे 69 वर्षांपूर्वी महावीर जयंती निमित्त शहरात आले होते. त्यावेळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले होते. त्यानंतर आता पहिल्यांदा अकरावी आचार्य महाश्रमण यांचे शहरात आगमन होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर आचार्य शहरात येत असल्याने जैन समाजात उत्साहाचे वातावरण आहे.
आचार्य महाश्रमण यांचे ८१ साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सात ते 11 मे दरम्यान भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील प्रेसिडेंट लोन येथे गुरुवारी नऊ मे रोजी सायंकाळी सात वाजता तप अनुमोदना गीत कार्यक्रम होणार आहे.
सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम शुक्रवारी 10 मे या दिवशी अक्षय तृतीया वर्षात तपपार्ना महोत्सव होणार आहे. त्याचप्रमाणे दररोज पहाटे चार वाजता उपासना, सामायिक, स्वाध्याय, मंगल पाठ, प्रवचन, सायंकाळी प्रतिक्रमण आणि अर्हत वंदना असे कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचे आयोजन आचार्य महाश्रमणजी अक्षय तृतीया प्रवास व्यवस्था समिती तर्फे करण्यात आले आहे.
तेरापंथ भवनचा लोकार्पण सोहळा मंगळवारी
गोलवाडी येथे श्रीजैन श्वेतांबर तेरापंथी सभा तर्फे उभारण्यात आलेल्या तेरापंथ भवन चा लोकार्पण सोहळा आचार्य महाश्रमण यांच्या हस्ते मंगळवारी सात मे रोजी होणार आहे.
आचार्य महाश्रमण हे जैन तेरा पंथ धार्मिक संघाचे अकरावी आचार्य आहेत. त्यांनी जनकल्याण आणि राष्ट्राच्या चारित्र्य निर्माण साठी अहिंसा पदयात्रा करत सद्भावना, नैतिकता आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला आहे.
आतापर्यंत नेपाळ, भूतान आणि भारतातील 23 राज्यात 60000 किलोमीटर पेक्षाही अधिक पदयात्रा त्यांनी केली आहे. त्यांच्या प्रेरणेने लाखो लोक व्यसनमुक्त झाले आहेत.आचार्य महाश्रमण ( जन्म 13 मे 1962) हे अकरावे आचार्य , जैन श्वेतांबर तेरापंथ पंथाचे सर्वोच्च प्रमुख आहेत .
महाश्रमण तेरापंथ संस्थेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व क्रियाकलापांचे प्रमुख आहेत, विशेषत: अनुव्रत , प्रेक्षा ध्यान , जीवन विज्ञान (जगण्याचे विज्ञान). सर्व तेरापंथ उप-संस्था, विशेषत:. आचार्य श्री महाश्रमण यांच्या मार्गदर्शनाखाली जैन विश्व भारती , तेरापंथ महासभा इत्यादी कार्यरत आहेत. त्यांचे विचार उदारमतवादी आणि धर्मनिरपेक्ष आहेत. अहिंसा, नैतिक मूल्ये आणि तत्त्वे यांना चालना देण्याचा त्यांचा ठाम विश्वास आहे. वयाच्या १२ व्या वर्षी, मुनी सुमेरमलजींनी रविवारी २०३१ वैशाख शुक्ल चतुर्दशीला म्हणजेच 5 मे 1974 रोजी त्यांना दीक्षा दिली.
दीक्षा घेतल्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन केवळ बाह्यच नव्हे तर अंतर्गत देखील बदलले. धर्मग्रंथांचा अभ्यास आणि ध्यान साधना हा त्यांच्या जीवनाचा एक भाग बनला. त्यावेळी अनावश्यक बोलण्यापासून दूर राहणे आणि यंत्राप्रमाणे सूत्रे लक्षात ठेवणे हा त्यांचा दिनक्रम होता.
अभ्यासाच्या काळात त्यांनी संस्कृत, प्राकृत, हिंदी आणि इंग्रजी अशा विविध भाषा शिकल्या. कधी ते गुरुदेवांसोबत राहिले आणि काही वेळा स्वतंत्र प्रवासही केला. विक्रम संवत २०४० पासून ते गुरुदेवांसोबत बिदासर मर्यादा महोत्सवात राहिले.
16 फेब्रुवारी 1986 मध्ये, उदयपूरमधील मर्यादा महोत्सवाच्या निमित्ताने, आचार्य तुलसींनी त्यांना त्यांच्या अंतर्गत कार्यात मदत करण्यास सांगितले. 10 मे 2022 (वैशाख शुक्ल नवमी) रोजी, त्यांचा 60 वा वाढदिवस (षष्ठीपूर्ती) त्यांच्या जन्मस्थानी, सरदारशहर येथे मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या शुभ प्रसंगी त्यांना ‘युगप्रधान’ म्हणून संबोधण्यात आले.