मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – वाढत्या महागाई विरोधात काँग्रेस पार्टीच्या वतीने हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसकडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच आपल्या मागणीचे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले.
वाढत्या महागाईने सर्वसामान्य, गोरगरिबांचे जीवन अत्यंत हलाखीचे झाले आहे. महागाईचे चटके या सर्वसामान्यांना बसत असून जगावे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकला आहे. महागाई कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परिणामी महाराष्ट्रासह देशभरातील गोरगरीब कुटुंब या महागाईच्या आगीत होरपळून निघत आहेत.
पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ झाली असून केंद्राकडून सर्वसामान्य गोरगरिबांना दीलासा मिळताना दिसत नाही. वाढत्या महागाई विरोधात 5 ऑगस्ट रोजी काँग्रेस पार्टीच्या वतीने हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवून प्रशासनाला निवेदन दिले.
आंदोलनावेळी काँग्रेस पक्षाकडून केंद्र व राज्यातील सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.