मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी पर्यवेक्षकाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना 14 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडल्याचे समजते. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता.
राजेश शिवाजीराव कोल्हाळ (वय 36 वर्षे, रा. कोंडवाडा ता. सेनगाव जि. हिंगोली) असे खून झालेल्या पर्यवेक्षकाचे नाव असल्याचे समजते. आखाडा बाळापूर येथील कृषी चिकित्सालयाचे बांधकाम सुरू आहे.
या बांधकामाची देखरेख व इतर कार्यालयीन कामे कृषी पर्यवेक्षक राजेश कोल्हाळ हे पहात होते. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी राजेश कोल्हाळ यांच्या पोटात चाकून े भोसकून खून केल्याची घटना घडली.
सदरील कृत्य हे कामावरील कामगारांनी जुन्या वादातून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.