मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील यहळेगाव गवळी येथील श्रीगोपाल कृष्ण मंदिर येथे आज 9 एप्रिल पासून अखंड हरिनाम सप्ताह, संगीत श्रीमद् भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक व येहळेगाव ग्रामस्थांनी केले आहे.
या अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठाचारी ह.भ.प. पांडुरंग महाराज दिग्रसकर हे असून श्रीमद भागवताचार्य ह. भ. प. संतोष महाराज ढाकरे हे आहेत. तर भागवत गायनाचार्य वैष्णव भजनी मंडळ येळेगाव हे असणार आहेत.
या सप्ताहात दररोज पहाटे 4 ते 6 या वेळेत काकडा आरती, सकाळी 6 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण, 10 ते 11 गाथा भजन, दुपारी 1 ते 2 भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 9 ते 11 हरी किर्तन व त्यानंतर हरी जागर असे दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
या सप्ताहात गायनाचार्य मधुकर ढाले, विजय चव्हाण, प्रभू लांडे, मृदुंगाचार्य विष्णू (आळंदी देवाची), लक्ष्मण मंदाडे, तसेच काकडा व हरिपाठ वैष्णव भजनी मंडळी येहळेगाव गवळी, चोपदार माधवराव सूर्यवंशी व बोलडा, पोतरा, कोंढुर, दिग्रस, म्हैसगव्हाण, हारवाडी, असोला, रुपुर, सालेगाव, सिंदगी, बोलडावाडी, येथील भजनी मंडळी सातही दिवस उपस्थित राहणार आहेत.
आज नऊ एप्रिल रोजी ह. भ. प. दामोदर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. 10 एप्रिल रोजी ह. भ. प. पांडुरंग महाराज (इटलापुरकर), 11 एप्रिल रोजी ज्ञानेश्वर महाराज (पांगरा शिंदे), 12 एप्रिल रोजी ह. भ. प. मुंजाराम महाराज भंडारे (म्हाळसापूर), 13 एप्रिल रोजी ह. भ. प. ज्ञानोबा महाराज धसाडीकर, 14 एप्रिल रोजी ह. भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिवनीकर, 15 एप्रिल रोजी ह.भ.प. सुरेश महाराज बोरखेडीकर यांचे कीर्तन होईल.
16 एप्रिल रोजी सकाळी 9 ते 11 श्री ची नगर प्रदक्षिणा, दुपारी 1 ते 3 या दरम्यान ह.भ.प. संतोष महाराज ढाकरे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविक – भक्त तसेच ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व येहळेगाव गवळी ग्रामस्थांनी केले आहे.