Marmik
Hingoli live

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मध्ये सहभागी होण्याचे जि. प. सीईओ यांचे आवाहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – केंद्र सरकारकडून (ग्रामीण) 2023 राबविले जात असून गावाची स्वच्छता अनुषंगाने तपासणी होणार आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण ) 2023 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

देशात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 सुरुवात झाली असून त्या अंतर्गत गावाची विविध घटकावर आधारित तपासणी केल्या जाणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 मध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे ग्रामपंचायत स्वच्छ सर्वेक्षण गावाचे स्वयं मूल्यांकन करणे अनिवार्य आहे.

त्याशिवाय सहभाग नोंदणी होत नाही. स्वयं मूल्यांकन भरण्यासाठी ई ग्राम स्वराज्य या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून दिली आहे. लिंकच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वयं मूल्यांकन भरणे अनिवार्य आहे. अन्यथा ssg 2023 मध्ये सहभाग होण्यास पात्र ठरणार नाही.

स्वयं मूल्यांकन मूल्यांकनात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत गावात झालेल्या कामाची माहिती भरण्यासाठी जास्तीत जास्त 25 मिनिटाचा कालावधी लागतो. तरी प्रत्येक गावाचे प्रथम स्वयं मूल्यांकन 15 डिसेंबर 2022 पूर्वी पूर्ण करण्यात यावी अशा सर्व पंचायत समिती च्या गटविकास अधिकारी यांना जिल्हा स्तरावर सूचना देण्यात आल्या आहे.

स्वच्छ सर्वेक्षण( ग्रामीण) 2023 मध्ये सहभागी होण्याची सर्व ग्रामपंचायत त्यांना संधी असून ई-ग्रामस्वराज्य संकेतस्थळावर जाऊन संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, यांनी दिलेल्या लिंक द्वारे प्रत्येक गावाचे स्वयं मूल्यांकन करावे असे आव्हान जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ए. एल. बोंद्रे यांनी केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणाची बाबत अधिकृत इतर सर्व माहिती जिल्हास्तरावरील समाजशास्त्रन सल्लागार राधेश्याम गंगासागर व तालुक्यातील जिल्हा समन्वय तज्ञ /सल्लागार सनियंत्रण जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद हिंगोली करणार आहे.

Related posts

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण: खडकपुरा येथील आरोपीस तीन वर्षाची सक्त मजुरी व 21 हजार रुपयांचा दंड

Santosh Awchar

मधमाशा पालन करून शेतीचे उत्पन्न वाढवा

Gajanan Jogdand

कोंबिंग ऑपरेशन : एकूण 45 इसमांना पकडून न्यायालयात केले हजर

Santosh Awchar

Leave a Comment