Marmik
Hingoli live

विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिन साजरा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / पांडुरंग कोटकर :-

सेनगाव – तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ येथे 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन आणि भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक वसंत गिरी (व्याख्याते), संस्थेच्या उपाध्यक्षा आनंदीताई बेंगाळ, संस्थेचे सचिव अंकुशराव बेंगाळ, प्राध्यापक जोगदंड, प्रकाशराव पाटील, एडवोकेट सिरसाट, एडवोकेट भास्करराव पाटील, मोईन सय्यद, इम्रान भाई, विलासराव बेंगाळ, केशवराव शिंदे, रामेश्वर पोले, कडूजी भगत, गजानन गीते, यादराव थिटे, कैलासराव मार्कड, गुलाबराव वाव्हळ, तुळशीराम गायकवाड तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य अभिषेक बेंगाळ,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सानप एस.एस. प्राथमिक शाळेचे मुख्याद्याक सरकटे व्ही.एस., आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बाजगिरे बी.जी. उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माटे यांनी केले. मेघा कोरडे, सचिन पावडे, मनीषा राठोड, वैभव उबाळे, साहिल सय्यद या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रकाशराव पाटील यांनी व्याख्यात्यांचा परिचय करून दिला व व्याख्याते प्राध्यापक वसंत गिरी यांनी ‘वंदे मातरम’ या विषयावर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रातिविरांचा 1857 पासून ते आज पर्यंतचा इतिहास जिवंत करून दाखवला भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सर्व थोरांचा विषय मांडला. अध्यक्ष बेंगाळ यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास म्हणजे शिक्षण हे सांगितले.

यावेळी सूत्रसंचालन शिंदे आर.बी.यांनी केले व आभार काळे बी.के. यांनी व्यक्त केले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts

पूर्णा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन सोडा ; कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश          

Gajanan Jogdand

शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा दोन राबविणार – पालकमंत्री अब्दुल सत्तार

Santosh Awchar

काजीपेठ-मुंबई रेल्वेच्या मागणीलाही महाप्रबंधांकडून रेड सिग्नल!

Santosh Awchar

Leave a Comment