Marmik
Bhoomika महाराष्ट्र

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि सविताचं जाण…

वेध

आपल्या प्रशासन व्यवस्थेत निर्जीव माणसं बसवलीत का? सर्वसामान्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी या बधीर प्रशासन वर्गाला वेळच नाही. सविताचा जीव नक्की वाचला असता. तिलाही इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार होता. अवघ्या ३२ वर्षीय सविताने जगाचा निरोप घेणे हे न पटणारे…

आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. स्वातंत्र्याचे ७५ वर्ष. पण हा महोत्सव साजरा करताना आपल्यातील अनेक जण खरचं स्वातंत्र झाले का? हा प्रश्न पडायला हवा. आजही आपला समाज न्याय मिळण्याच्या अपेक्षेने पोलिस ठाणे,न्यायालये, जिल्हाधिकारी किंवा इतर ठिकाणी जातो. तेव्हा त्याच्या पदरी निराशाच येते. नुकतेच संभाजीनगर मध्ये धक्कादायक घटना घडली. ३२ वर्षांच्या सविताने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतलं. ही घटना संभाजीनगर पोलिस आयुक्तालयासमोर घडली.तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

सविताने इतकं टोकाचे पाऊल का उचलले? तिच्यानंतर तिच्या दोन लहान मुलांचे काय होणार? मृत्यूनंतर तिला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस तपास करणार की नाही? सविता गेली त्याबरोबर तिच्या तक्रारीची दखल घेतली जाणार की नाही? सविताने पेटवून घेतले कारण शेजाऱ्यांंबरोबर सतत वाद होतं. दुसरीकडे शेजाऱ्यांची बाजू घेऊन पती तिला मारहाण करत. याबाबतची तक्रार दाखल करण्याची ती वाळूज पोलिस ठाण्यात गेली. पण तिथे तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. मग तिने थेट संभाजीनगर येथील पोलिस आयुक्तालय गाठले. 

तिथे तिने स्वतःला पेटवून घेतले. यातच सविताचा मृत्यू झाला. जर वेळीच तिच्या तक्रारीची दखल घेतली असती तर तिने इतके टोकाचे पाऊल उचलले नसते. या निमित्त प्रश्न पडतो की पोलिस यंत्रणा इतकी असंवेदनशील का झाली? सविताने ज्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा ठेवली त्यांनीच तिच्या तक्रारीचे गांभीर्य ओळखले नसल्याचे दिसते. आपल्या प्रशासन व्यवस्थेत निर्जीव माणसं बसवलीत का? सर्वसामान्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी या बधीर प्रशासन वर्गाला वेळच नाही.सविताचा जीव नक्की वाचला असता. तिलाही इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार होता. अवघ्या ३२ वर्षीय सविताने जगाचा निरोप घेणे हे न पटणारे…

(सदरील लेख संभाजीनगर येथील प्रख्यात पत्रकार गणेश पिटेकर यांच्या ब्लॉग स्पॉट वरून घेण्यात आला आहे)

Related posts

पत्रकारितेतील हरवत चाललेली मूल्य

Gajanan Jogdand

पेरणीसाठी स्वतःचीच जमीन मिळेना; तहसीलदारांच्या आदेशांना मंडळ अधिकार्‍यांकडून केराची टोपली

Jagan

आषाढ एकादशी : श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळास पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Gajanan Jogdand

Leave a Comment