मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
हिंगोली – येथील शिक्षण विभागाच्या अनियमित कामे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने आंदोलन उभारून जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी व सर्वसामान्य जनतेच्या मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण व सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
विद्यार्थी, पालक, नागरिक समाजसेवक, रोजगार शोधणारे युवा वर्ग आणि सुज्ञ नागरिकांना विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिलच्या वतीने हिंगोली भ्रष्ट शिक्षणाधिकारी तसेच इतर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चल – अचल संपत्तीची माहिती असल्यास समक्ष भेटून द्यावी किंवा व्हाट्सअप टाकावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील शिक्षण विभागात शालेय पोषण आहारामधील भ्रष्टाचार,अनियमितता,शाळा अनुदानामध्ये अफरातफर व भ्रष्टाचार,नगण्य भौतिक सोई सुविधा, U-Dise मध्ये बोगस माहिती, शाळा व्यवस्थापन समितीद्वारे निर्णय, स्थानिक बचत गटाद्वारे पोषण आहाराएवजी संस्थाद्वारा मनमानी कारभार व भ्रष्टाचार, विद्यार्थ्याना पुस्तके, शालेय साहित्य,खेळ साहित्य,प्रयोग साहित्य, प्राथमिक उपचार न पुरविणे व यामध्ये भ्रष्टाचार,शिक्षकांची अनुपस्थिती, आर्थिक गैरव्यवहाराच्या आधारे भरती, TET घोटाळा, जुन्या तारखेत वयक्तिक मान्यता देऊन थकबाकी फरकाची रक्कम व अनुदानाची रक्कम प्रदान करणे,बोगस संच मान्यता,ईत्यादी अनेक बोगस व अनियमित शिक्षक मान्यता देऊन तसेच अनियमित कामे करून शिक्षणधिकारी (प्रा.)जिल्हा परिषद, हिंगोली संदिपकुमार सोनटक्के यांच्यासह कंत्राटी डाटा कर्मचारी, लिपीक व तालुक्यातील शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी कोट्यावधीचा भ्रष्टाचार करून चल – अचल संपत्ती जमा करून शासनाचा कोटीवधीचा नुकसान केलेला आहे. या भ्रष्ट्राचाऱ्यांनी जमा केलेली चल – अचल संपत्तीची काही माहिती आमच्या कडे उपलब्ध आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांना वरील भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांन बद्दलची अजून माहिती आपल्या कडे उपलब्ध आपले कर्तव्य समजून माझ्या वॉट्सअप वर किंवा समक्ष भेटून दयावी,त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल च्या वतीने करण्यात येत आहे.
यासाठी नागरिकांनी शेख नईम शेख लाल संस्थापक अध्यक्ष मो.9423141215, शेख नौमान नवेद नईम (राष्ट्रीय संचालक) मो. 7385252020 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.