मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – शहरातील नांदेड नाका येथे गांजाची अवैधरित्या वाहतूक करणारा ऑटो हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. यावेळी पथकाने 10 किलो 62 ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे 2 लाख 50 हजार रुपये) सह ऑटो असा एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
हिंगोली येथील पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात शासनाने उत्पादन, लागवड व विक्री प्रतिबंधित केलेली वनस्पती गांजा अवैध विक्री विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यामुळे हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंडित कचवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने यांच्या पथकास 10 नोव्हेंबर रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक ऑटो (क्रमांक एम एच 26 बीडी 4535) मध्ये शासनाने उत्पादन, लागवड व विक्रीस प्रतिबंधित केलेली वनस्पती गांजा अवैध विक्री करण्यास वाहतूक होत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या या पथकाने माहिती मिळालेल्या ठिकाणी तात्काळ पोहोचून हिंगोली शहरातील नांदेड नाका येथे सदर संशयित ऑटोस ताब्यात घेऊन तपासणी केली.
यावेळी ऑटोमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या पोत्यात खाकी रंगाच्या चिकट टेपने चिटकवलेल्या पुठ्ठ्यामध्ये शासनाने उत्पादन, लागवड व विक्रीस प्रतिबंधित केलेली वनस्पती गांजा 10 किलो 62 ग्रॅम किंमत अंदाजे (2 लाख 50 हजार रुपये) व ऑटो असा एकूण 4 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरील चोरटी विक्री करणारा व्यक्ती शेख युनूस शेख सलीम (वय 38 वर्ष, रा. माळटेकडी, स्टेशन रोड मिलल्लतनगर, इतवारा, नांदेड) याच्या ताब्यात मिळून आला.
सदरचा माल हा आरोपी इसाक (रा. नांदेड) याच्या सांगण्यावरून विक्रीस आणल्याबाबत सांगितल्याने या दोन्ही आरोपीं विरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुरनं 878 / 2023 कलम 20 (ब) (ii), 8 (क) एनडीपीएस ऍक्ट सहकलम 34 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठूबोने, पोलीस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, शंकर ठोंबरे, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या पथकाने केली.