Marmik
Hingoli live News

…अन भाऊराव पाटलांनीही थोपटले दंड! जनता, कार्यकर्त्यांना वाटू लागले हायसे

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी

हिंगोली – येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 27 ऑगस्ट रोजी सभा होत असून 28 ऑगस्ट रोजी शिंदे गटाचे विद्यमान लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांची कावड यात्रा निघणार आहे. या दोन्ही इव्हेंटनी जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघत असताना त्यात हिंगोली विधानसभेचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी उडी घेतली आहे….

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काही महिन्यांपूर्वीची नियोजित सभा उद्या 27 ऑगस्ट रोजी हिंगोली येथील रामलीला मैदानावर पार पडणार आहे तर मागील जवळपास दीड महिन्यांपासून कावड यात्रेच्या जयत तयारीला लागलेले कळमनुरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांची कयाधू अमृतधारा कावड यात्रा सोमवारी 28 ऑगस्ट रोजी निघणार आहे.

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जिल्ह्यातील त्यांच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील, तसेच काही मुद्दे मांडतील. त्यांची सभा राजकीय असेल तर शिंदे गटाचे लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर यांची निघणारी कावड यात्रा ही धार्मिक असली तरी लोकप्रिय आमदार संतोष (दादा) बांगर हे कावड यात्रेचे नेतृत्व करणार असल्याने आपल्या धार्मिक भावना आणि देवावरील श्रद्धा ठेवून या कावड यात्रेसही राजकीय झालर असेल! एका नंतर एक होणारे हे दोन्ही इव्हेंट राजकीय दृष्ट्या तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहेत.

या दोन्ही इव्हेंटने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. त्यातच आता हिंगोलीचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी एन्ट्री घेतली असून त्यांचे कारण वेगळेच आहे.

मागील काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाकडून हिंगोली विधानसभेसाठी तयारीला लागलेले माजी आमदार भाऊराव पाटील हे आगामी विधानसभेसाठी दंड थोपटून उभे आहेत. त्यांनी प्रत्यक्षात कार्यकर्त्यांसमोर कावड यात्रे प्रसंगी दंड थोपटले आहेत. राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 ऑगस्ट रोजी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथून हिंगोली येथे कावड यात्रा दाखल झाली.

ही कावड यात्रा माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या निवासस्थानी थांबली असता कावड यात्रेचे आदरा आदरातिथे झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी भाऊराव पाटील यांना उचलून खांद्यावर घेतले त्यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून दंड थोपटले. त्यामुळे चर्चेला उधाण आले असून आगामी विधानसभेसाठी त्यांनी दंड थोपटल्याचे सूत्रांनी सांगितले.

उद्या आणि परवा होणाऱ्या दोन इव्हेंटला आणि माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांना पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि महत्त्वाचे म्हणजे जनता किती पसंत करते हे पाहणे गरजेचे आहे…

Related posts

आडगाव येथील शेतकऱ्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घ्या, संजय भैया देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Gajanan Jogdand

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची सेनगाव येथे कारवाई; 9 हजार 250 रुपयाचा दंड वसूल

Gajanan Jogdand

आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत कळमनुरी येथे रामचंद्र सात महाराज यांचा पालखी सोहळा भक्तीभावात साजरा

Santosh Awchar

Leave a Comment