Marmik
News

द ड्रीमबेरी स्कूलची श्रीरामबाग वाटर पार्क येथे शैक्षणिक सहल; विद्यार्थ्यांनी घेतला हुरडा पार्टीचा आनंद

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

परभणी – येथील गांधी पार्क येथे असलेल्या द्रीमबेरी स्कूल या नामांकित शाळेची धर्मापुरी जिंतूर रोड येथील श्रीराम भाग वाटर पार्क या निसर्गरम्य ठिकाणी शैक्षणिक सहल काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी सहलीचा मनमुराद आनंद घेत हुरडा पार्टीचा ही स्वाद घेतला.

परभणी शहरातील गांधी पार्क येथे असलेला द ड्रीमबेरी स्कूल च्या वतीने दरवर्षी नाविन्यपूर्ण वस्तू ते उपक्रम राबविले जातात. यावर्षी 27 जानेवारी रोजी या शाळेची परभणी शहरातील धर्मापुरी – जिंतूर रोड वर असलेल्या श्रीराम भाग वाटर पार्क या निसर्गरम्य ठिकाणी शैक्षणिक सहल नेण्यात आली.

शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना नैसर्गिक सहवास मिळावा विद्यार्थी पर्यावरणाशी जोडले जाऊन त्यांची घट्ट नाळ जुळावी या हेतूने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक अश्विन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ते नियोजन करून सदरील शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

या शैक्षणिक सहलीस मार्मिक महाराष्ट्र समूहाचे सॅटॅलाइट संपादक संतोष एन. आठवले यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत अवगत केले.

शाळेने अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात मनोरंजनाचे योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर विद्यार्थी पालकांचेही मोठ्या प्रमाणात या सहलीसाठी सहकार्य मिळाले.

या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी श्रीराम बागेतील हुरडा पार्टी बरोबरच बारा बोलुतेदार विविध पशु – पक्षी, प्राणी धार्मिक स्थळे यांना भेटी देऊन आनंद व्यक्त केला. शालेय जीवनात दैनंदिन अभ्यासाबरोबरच शैक्षणिक सहलीचे सर्वांनाच एक वेगळे महत्त्व कळाले. यावेळी शाळेतील शिक्षिका खेडकर, वट्टमवार, वानरे, सेविका महामुनी आदींची उपस्थिती होती.

Related posts

हिंगोली येथे 10 टवाळखोरांवर दामिनी पथकाची कारवाई

Gajanan Jogdand

हिंगोली पंचायत समितीत कागदाचा तुटवडा! नागरिकांना कोरे कागद मिळेनात

Gajanan Jogdand

भारतीय संविधान लोकशाही अमृत महोत्सव : उल्हासनगर येथे मिशन जय भारत आवाज जनतेचा जनसभा

Gajanan Jogdand

Leave a Comment