‘मार्मिक महाराष्ट्र’ चम्मू कडून आज पासून औंढा नागनाथ तालुक्यातील अंगणवाड्यांची वस्तुस्थिती प्रशासन व वाचकांसमोर मांडत आहोत याबाबतचा हा पहिला अध्याय.
मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-
औंढा नागनाथ – तालुक्यातील अंगणवाड्यांवर संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने अनेक गावात बालकांना पोषण आहार दिला जात नाही किंवा अनेक ठिकाणी जास्त मुले दाखवून पोषण आहार ढापण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत. तसेच अनेक अंगणवाड्यांमध्ये बालकांना खेळण्यासाठी कोणतेही साहित्य व साधन उपलब्ध नाहीत. या सर्व प्रकाराकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील बरीच गावे आती दुर्गम भागात असल्यामुळे काही छोटे – मोठे वाडी तांडे आहेत. येथील अंगणवाडी कधी उघड्या तर कधी बंदच दिसून येतात. वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नाही. ग्रामीण व अत्यदुर्ग भाग असल्याने केवळ अंगणवाड्या चालू असतात की बंद हे अधिकाऱ्यांना माहित नसते. कारण याकडे कोणाचे लक्ष जात नाही. लहान मुले एक केवळ पाच वर्षातील असल्याने त्यांना खाऊ साठी बऱ्याच काही सुविधा उपलब्ध करून दिलेले असतात. परंतु खेडेगावात अद्यापही या योजना पोहोचल्या जात नाहीत.
गुत्तेदारामार्फत पुरवठा करण्यात येतो, परंतु तो पोषण आहार बरोबर आहे की नाही, माल बरोबर पोहोचला की नाही याचे नियंत्रण नाही. जास्त माल आणून ग्रामीण भागात कमी त्यात साखर, तेल इत्यादी ज्या काही वस्तू असतात त्या कमी प्रमाणात दिल्या जातात. त्याही सुविधा वेळेवर लहान बालकांना दिल्या जात नाहीत. काही ठिकाणी तर चकांगणवाड्या कुलूप बंद असतात.
मार्मिक महाराष्ट्र औंढा नागनाथ प्रतिनिधीने अनेक ठिकाणी भेट दिली असता बहुतांश मुले नसतानाही जास्त मुले दाखवून लूट होत असल्याचे दिसून आले. त्यांना वेळेचे बंधन सुद्धा नसते. कधीही उघडा! कोणी येणार असला केव्हा अचानक आला आला तरच अंगणवाड्या उघडल्या जातात. नसता बंदच असतात. अनेक ठिकाणी इमारती नाहीत किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी साधन उपलब्ध नाही.
लाखो रुपये शासनाने खर्च करून अद्यापही वाडी तांड्यांना ह्या सुविधा पोहोचत नसून तालुका स्तरावरून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसून येत आहे. याच्यावर समिती नाही, यांच्यावर देखरेख करणारी यंत्रणा नाही. सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर कठोर कारवाई करून लहान मुलांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी तालुक्यातून होत आहे.