मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा समाजावरील लाठी चार्ज घटनेचा निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने 4 सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
सदरील आवाहन संदर्भात 3 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथील नागनाथ सभागृह येथे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्यासोबत समन्वय बैठक घेतली.
सदरील बैठकीत हिंगोली पोलीस अधीक्षक यांनी सकल मराठा समाजाचे आंदोलन शांतता व लोकशाही मार्गाने करण्याबाबत सूचना देऊन अचानकपणे कोणतेही आंदोलन न करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच सकल मराठा समाज हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी यांनीही सदरच्या आंदोलन शांततामय मार्गाने करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपाधीक्षक गृह एस. एस. आम्ले, स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंडित कचवे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोलीस निरीक्षक सय्यद, तालुका जिल्हा विशेष शाखाचे पोलीस अंमलदार गजानन निर्मले घुगे यांच्यासह हिंगोली सकल मराठा समाजाचे मनोज आखरे, भूषण देशमुख, शिवाजीराव भोकरे पाटील, सतीश पाटील महागावकर, बाजीराव इंगोले, मदन इंगोले, अमोल तिडके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.