Marmik
Hingoli live

अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये अंमली पदार्थ विरोधी ठराव घ्यावेत – जिल्हाधिकारी पापळकर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालण्यासाठी गावात कोठेही अंमली पदार्थ विक्री अथवा वापर होणार नाही व गाव अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये अंमली पदार्थ विरोधी ठराव घ्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक दि. 4 ऑक्टोबर, 2023 रोजी घेण्यात आली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक जी. जी. पवार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी पी. एस. जाधव, पोस्ट ऑफिसचे आर. डी. बगाटे, समाज कल्याण विभागाचे ए. एन. वागतकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मनोज पैठणे, जिल्हा माहिती कार्याललयाचे चंद्रकांत कारभारी उपस्थित होते.

अंमली पदार्थाला आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांची बैठक घेऊन आपल्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थाची लागवड अथवा विक्री नाही याची दक्षता घेण्यात यावी. शहरातील डार्क व हॉट स्पॉट परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी.

हिंगोली शहरातील आजम कॉलनी, बावणखोली, मस्तानशाह नगर भागात नगरपालिकेकडून स्ट्रीट लाईट व सीसीटीव्ही बसविण्यासाठी पत्र द्यावेत. आरटीओ, रेल्वे, एसटी  महामंडळांने गोपनीय माहिती काढून कारवाई करण्यासाठी पोलीस विभागाला कळवावे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुकानिहाय मेडिकल असोशिएशनच्या बैठका घेऊन अंमली पदार्थाची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या.

जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयामध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करावी. समाज कल्याण विभागाने शाळा व महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ व गुटखा संबंधी राबविलेल्या प्रत्येक उपक्रमाची माहिती संकलीत करुन त्याचा अहवाल सादर करावा.

आरोग्य विभागाने अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या लोकांवर उपचार करुन त्यांना समुपदेशन करावे. तसेच कोणत्या ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन करणारे लोक आहेत याची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी. जिल्हा डाकघर कार्यालयात संशयास्पद वाटणारे पार्सल तपासणी करावी.

नार्को रजिस्टर ठेवून त्यामध्ये प्रत्येक टपालाची नोंद करावी. जिल्ह्यातील एनडीपीएस संबंधाने जास्तीत जास्त कार्यवाही करण्याची विशेष मोहिम पोलीस विभागाने राबवावी.

अंमली पदार्थांची होणारी वाहतूक व व्यापारावर प्रतिबंध घालावी. हिंगोली जिल्हा पोलीस दलातर्फे सन 2023 या वर्षात अंमली पदार्थ विरोधी सात प्रकरणावर कार्यवाही करण्यात आली आहे.

हे सर्व गुन्हे वाहतूक होत असतानाचे असल्याने पुढील बैठकीस महामार्ग पोलिसांच्या प्रतिनिधीला उपस्थित राहण्यासाठी कळवावे,अशा सूचनाही पापळकर यांनी यावेळी दिल्या.  

Related posts

हिंगोली ते नांदेड महामार्गावरील भेंडेगाव पाटीवर रोडला आले तळ्याचे स्वरूप! दोन ते तीन फूट पडले खोल खड्डे!!

Santosh Awchar

कुरुंदा येथे हळदी – कुंकाचा कार्यक्रम

Gajanan Jogdand

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

Santosh Awchar

Leave a Comment