मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने हिंगोली जिल्ह्यात अवैध धंदे व बेकायदेशीर हत्यार बाळगणाऱ्यांविरुद्ध कार्यवाहीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत 18 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथील दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकास पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील उमरा वाबळे या गावातील हरिदास मुटकुळे हा त्याच्या घरी बेकायदेशीर रित्या धारदार हत्यार (तलवार) बाळगताना मिळून आल्याने त्यास सदर हत्यार तलवार सह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4 / 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार शैलेश चौधरी, धनंजय पुजारी, अर्जुन पडघन, आझम प्यारेवाले, विजय घुगे सर्व दहशतवाद विरोधी शाखा यांनी केली.