मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध धंद्यान विरोधात विशेष मोहीम चालू आहे.
26 नोव्हेंबर रोजी सदर विशेष मोहिमेत कार्यवाही कामे पेट्रोलिंग करीत असताना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील कनेरगाव नाका परिसरात अवैधरित्या विक्रीसाठी मारुती सुझुकी कार मध्ये घेऊन जाणाऱ्या देशी दारू भिंगरी संत्राचे तब्बल 15 बॉक्स, एका बॉक्समध्ये 180 एम एल चे 48 बॉटल प्रमाणे 720 बॉटल ज्याची किंमत 57 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल व एक मारुती सुझुकी वॅगनार कार (जिची किंमत दोन लाख रुपये आहे) असा एकूण 2 लाख 57 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपी अभय बबन इंगळे (रा. महादेव वाडी हिंगोली), शुभम गजानन भावके (रा. गवळीपुरा हिंगोली) व कनेरगाव येथील नमूद जयस्वाल देशी दारू दुकानाचा मालक अशा तिघा इसमान विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार अर्जुन पडघन, आजम प्यारेवाले, विजय घुगे यांनी केली.
दोस्ती मित्रमंडळ जुगार अड्ड्यावर धडक कार्यवाही
स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे 26 नोव्हेंबर रोजी सदर विशेष मोहिमेत कार्यवाही कामे पेट्रोलिंग करत असताना हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हट्टा पोलीस ठाणे हद्दीत आडगाव रंजे येथे दोस्ती मित्र मंडळ नावाने सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून नगदी 55 हजार 650 रुपये व 11 मोबाईल ज्यांची किंमत 91 हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख 47 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या फिर्यादीवरून शेख बडेसाब कासिम (रा. परभणी), शेख बशीर शेख कबीर (रा. परभणी), मतीन खा चांदखा (रा. परभणी), पंजाब साहेबराव देशमुख (रा. हट्टा), शेख फिरोज शेख रशीद (रा. हट्टा), भारत रावसाहेब गाडगे (रा. परभणी), शेख सलीम शेख रहीम (रा. हट्टा), देवराज बालकिष्ट्या चिडगु (रा. हट्टा), प्रल्हाद लक्ष्मणराव भवर (रा. हट्टा), प्रकाश जळबाजी जमदाडे (रा. पूर्णा), शेख अनवर शेख महेमुद (रा. पूर्णा), मुजीबखा मेहताबखा पठाण (रा. पूर्णा), बबन विठ्ठलराव भवर (रा. हट्टा), शेख अमजद शेख दाऊद (रा. पूर्णा), अमजद खान पठाण (रा. पूर्णा), लक्ष्मीकांत बापूराव देशमुख (रा. हट्टा) अशा एकूण 16 आरोपींविरोधात हट्टा पोलीस ठाणे येथे भादविसह महाराष्ट्र जुगार कायदा गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात हिंगोली येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, अंमलदार भगवान आडे, संभाजी लेकुळे, ज्ञानेश्वर सावळे, सुमित टाले, विठ्ठल काळे, आकाश टापरे, तुषार ठाकरे, शेख जावेद यांनी केली.