Marmik
Hingoli live

हिपॅटायटीस आजाराची तपासणी, लसीकरण करुन घेण्याचे आवाहन

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम हा सर्व जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात 4 आदर्श उपचार केंद्र व 32 उपचार केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या केंद्रामार्फत हिपॅटायटीस रुग्णांची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

हिपॅटायटीस या आजाराबद्दल समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी “It’s time for action’’ हे हिपॅटायटीस दिनाचे घोषवाक्य आहे.

केंद्र शासन व राज्य शासनाच्या सूचनेनुसार हिपॅटायटीस दिनानिमित्त दि. 22 जुलै, 2024 ते दि. 3 ऑगस्ट, 2024 या कालावधीत हिपॅटायटीस पंधरवाडा साजरा करण्याबाबत सूचित केले आहे.

या अनुषंगाने हिंगोली जिल्हा रुग्णालयात जागतिक हिपॅटायटीस पंधरवाडानिमित्त दि. 24 जुलै, 2024 रोजी प्रसुती कक्षातील रुग्णासंबंधित आरोग्य सेवक (HCW) यांना हिपँटायटीस ब आणि क ची तपासणी करण्यात आली आहे. गरोदर माता व इतर रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.

जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त शासकीय नर्सिंग कॉलेजच्या सर्व प्रशिक्षणार्थीची हिपॅटायटीस आजाराची बी व सी तपासणी करुन निगेटीव्ह आलेल्या प्रशिक्षणार्थीना लसीकरण करण्यात येणार आहे.

जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त पंधरवाडा साजरा करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी प्रसूती कक्षातील रुग्णा संबंधित तपासणी शिबीरास भेट देवून पुढील कार्यक्रमास मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमास डॉ. सुनिल पाटील (पॅथालॉजीस्ट वर्ग-१), चिचंकर (मेट्रन), आशा क्षीरसागर (सहा, अधिसेविका), रागिनी जोशी (प्रसुती कक्ष इन्चार्ज सिस्टर), सरोज दांडेकर, शुभम राठोड, अनिस प्यारेवाले यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गाभणे लक्ष्मण, व्ही. एस.आंबटवार कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारीका इत्यादींनी परिश्रम घेतले.

हिंगोली जिल्ह्यातील जनतेला या कार्यक्रमामार्फत दैनदिन जीवनात वावरतांना हिपॅटायटीस आजारासंदर्भात वेळोवेळी रक्त तपासणी करावी व हिपॅटायटीस या आजाराचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्याकडून करण्यात येत आहे.


Related posts

आरोग्य विभागाची आढावा बैठक; साथरोग होऊ नये याबाबत सर्वांनी सतर्कता बाळगावी – मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने

Santosh Awchar

औंढा नागनाथ शहरात शिवसेनेचा जल्लोष; गाव तेथे बूथ होणार

Gajanan Jogdand

हिंगोली जिल्ह्यात एकाच वेळी कोंबिंग ऑपरेशन! 41 ठिकाणी सराईत गुन्हेगारांची तपासणी, तिघांवर गुन्हे दाखल तर दोघांना अटक, जामीन पात्र 20 जणांना वॉरंट

Santosh Awchar

Leave a Comment