हिंगोली, मुंबई : संतोष अवचार, पांडुरंग कोटकर /-
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सुधारित किमान वेतन अखेर राज्य शासनाने मंजूर केले आहे. साप्ताहिक मार्मिक महाराष्ट्र मध्ये गतवर्षी याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते. उशिरा का होईना या वृत्ताची दखल घेऊन तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 या संघटनेच्या निर्धार मोर्चाचे फलित झाले असून किमान वेतन मंजूर झाल्याने राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कडून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
Covid-19 च्या संक्रमण काळात राज्यातील सर्व कार्यालय बंद असताना ग्रामपंचायत कार्यालय स्तरावर ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी मात्र या कठीण काळातही आपली सेवा बजावत होते. ही सेवा बजावताना सेनगाव तालुक्यातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या अत्यल्प वेतन संदर्भात साप्ताहिक मार्मिक महाराष्ट्र कडे शिवसेना आमदार संतोष (दादा) बांगर, आमदार राजू नवघरे, आमदार झनक आदी मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तेव्हापासून किंबहुना त्याही आधीपासून राज्यातील कर्मचारी चातकाप्रमाणे सुधारित वेतनाची वाट पाहत होते. सुधारित वेतनासाठी 9 व 10 मार्च रोजी 25 हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर निर्धार मोर्चा काढला होता. तसेच मागील दहा दिवसांपासून मंत्रालयीन कामकाज महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 हिंगोली चे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, वसमत तालुक्याचे तालुकाध्यक्ष रामकिशन जाधव, तालुका सचिव प्रभाकर कराळे, फुलाजी इंगोले, एकनाथ चोपडे, यांनी सांभाळले तर मागील दोन दिवसापासून राज्य अध्यक्ष विलास कुमरवार, सरचिटणीस शिरीष दाभाडकर, कार्याध्यक्ष माजी सचिव दिलीप डिके, विभागीय कार्याध्यक्ष दत्ता भोईर, उपाध्यक्ष मायाताई शेलार, श्याम भोईर अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अभय सावंत, अमरावती जिल्हा अध्यक्ष मंगेश ढोरे,हिंगोली कार्याध्यक्ष रामराव कल्याणकर, उपाध्यक्ष भागवत इंगोले, सचिव नागसेन खंदारे, दिलीप राठोड, जालना जिल्हाध्यक्ष मल्हारी कदम, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष उद्धव घाडगे, सचिव अरुण रसाळ, तालुका सचिव विकास सोनवणे, वाशिम जिल्हा अध्यक्ष दिगंबर सोनटक्के, मल्हारी कदम, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष, एकनाथ कीर्तिकर आदींनी अथक परिश्रम घेतले.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन मंजूर झाल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 4511 च्या वतीने तसेच राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे कामगार मंत्री तथा धडाकेबाज नेते बच्चू कडू, वसमत चे आमदार राजू नवघरे, हिंगोली चे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले आहेत. किमान वेतन मंजूर झाल्याने राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
बोले तैसा चाले
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी पंचेचाळीस अकरा चे हिंगोली जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे यांनी दहा दिवसापूर्वी आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतन मंजूर झाल्याशिवाय परतणार नाही असे सांगितले होते. त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला असून बोले तैसा चाले ही म्हण आपल्या बाबत खरी करून दाखविले आहे.