Marmik
Hingoli live Love हिंगोली News

Hingoli संभाजीनगर येथे अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य भरती मेळावा

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – अग्निपथ योजनेंतर्गत दि. 13 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर, 2022 या कालावधीत संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्टेडियमवर संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.           

याबाबतच्या अटी व शर्ती, अधिसूचना केंद्र शासनाच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  या संकेतस्थळावर जाऊन अग्नीवीर जनरल ड्यूटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्नीवीर क्लार्क/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्नीवीर ट्रेडसमॅन दहावी पास व अग्नीवीर ट्रेडसमॅन 8 वी पास या पदासाठी दि. 30 जुलै, 2022 पर्यंत नोंदणी करावी.वरील संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारानाच सैन्य भरती मेळाव्यासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी संकेतस्थळावरुन आपले ॲडमिट कार्ड काढून सोबत आणणे आवश्यक आहे.

हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करुन सैन्य भरती मेळाव्यास उपस्थित राहावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे.

Related posts

जिल्हा वार्षिक योजनेच्या 238 कोटी 71 लाखांच्या प्रारुप आराखड्यास व जिल्ह्याची अर्थव्यवस्था 2027 पर्यंत 45 हजार कोटी करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्याच्या प्रारुपास मान्यता

Santosh Awchar

वातावरण बदल: शीत लहरींनी हिंगोलीकर गारठले!

Gajanan Jogdand

निजाम काळापासून चालत आलेला गुगुळपिंपरी येथील दसरा महोत्सव; उत्सवाने जोपासल्या अनेक कला! नवसाला पावणाऱ्या देवांची गावातून काढली जाते आगळीवेगळी मिरवणूक

Gajanan Jogdand

Leave a Comment