मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-
हिंगोली – गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरातील नागरिकात आणि भाविकात चैतन्याचे वातावरण असून तब्बल दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात आणि हर्ष उल्हासात गणेश उत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवासाठी लागणारे गणेश मुर्ती घडविण्याचे काम रिसाला येथील कारागीर करत आहेत हे कारागीर देखण्या गणेश मुर्ती घडवत आहेत.
हिंगोली शहरातील रिसाला भागात वास्तव्यास असलेले रोहित उचांडे हे आपल्या परिवारासह गणेश मुर्ती घडविण्याचे काम करतात. प्लास्टर ऑफ पॅरिस पासून गणेश मुर्ती तयार केल्या जात असून आकर्षक आणि विविध आकाराच्या मूर्ती घडविल्या जात आहे. त्यांच्या गणेश मूर्ती एवढ्या लोभस आणि आकर्षक आहेत की पाहता क्षणी कोणीही त्यांच्या गणेश मूर्तीला पाहतच राहील.
रोहित उचांडे यांनी सध्या विविध आकाराच्या मोठ्या प्रमाणात गणेश मुर्त्या तयार केल्या असून लहानापासून मोठ्या गणेश मूर्तीसाठी त्यांच्याकडे ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत. 51 रुपयांपासून 20 हजार रुपयांपर्यंतच्या गणेश मूर्ती घडवल्या असून मोठ्या गणेश मूर्त्यां साठी ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत.
नागरिकांनी रिसाला बाजार येथे येऊन आत्ताच ऑर्डर देऊन हव्या तशा आणि हव्या त्या आकाराच्या मुर्त्या उपलब्ध असून नागरिकांनी त्यांच्याकडील गणेश मुर्त्या घेऊन जाव्यात पर्यावरण पूरक अशा गणेश मुर्त्या रोहित उचांडे व त्यांचा परिवार बनवत आहेत.
सदरील गणेश मुर्त्या विसर्जनानंतर तात्काळ पाण्यात विरघळतात अतिशय देखण्या अशा गणेश मुर्त्या त्यांच्याकडे उपलब्ध असून नागरिकांनी एकदा रिसाला बाजार येथील रोहित उचांडे यांच्या वाशिम रोडवर असलेल्या दुकानास आवर्जून भेट द्यायला हवी.