Marmik
Hingoli live

आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरमच्या जिल्हाध्यक्षपदी अरुण दिपके, हिंगोली जिल्हा कार्यकारिणी घोषित

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / प्रतिनिधी :-

हिंगोली – येथील शासकिय विश्राम गृह येथे आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरमची जिल्हा बैठक जेष्ठ पत्रकार व समाजभूषण मधूकर मांजरमकर यांच्या अध्यक्षते खाली व केंद्रीय महासचिव प्रकाश सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत संघटनेच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी अरुण दिपके यांची निवड करण्यात आली. यावेळी हिंगोली जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

या बैठकीला जिल्ह्यातील पत्रकार उपस्थितीत होते. पत्रकारांच्या न्याय आणि हक्कांसाठी कार्यरत असलेल्या आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरमच्या या कार्यक्रमात संघटनेच्या ध्येय धोरणाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान चर्चिले गेले.प्रकाश सरदार यावेळी बोलताना म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पत्रकारिता क्षेत्रात अभिनव आहेत. त्यांचे कार्य सामजिक न्याय आणि समानतेच्या दिशेने नेणारे आहे. आजच्या पत्रकारितेत या विचारांचे प्रमाण असणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व स्तरातील लोकांच्या आवाजाला महत्त्व मिळू शकेल.”

सरदार यांनी संघटनेच्या उद्दिष्टांची माहिती दिली, ज्यात पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण करणे, सामाजिक न्यायासाठी लढा देणे आणि बौद्ध पत्रकारांना प्रोत्साहन देणे हां समाविष्ट आहे. त्याबरोबरच, त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र करून एक मजबूत प्लॅटफॉर्म निर्माण करण्यावर देखील जोर दिला.


त्यांनतर जिल्हा कार्यकारणी घोषीत केली. त्यामध्ये जिल्हा अध्यक्ष अरुण दिपके, जिल्हा सचिव प्रा . यू.एच.बलखंडे, जिल्हा उपाध्यक्ष रेखा सरोदे, जिल्हा संघटक शांताबाई मोरे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. विशाल सितळे , प्रसिद्ध प्रमुख संतोष सरोदे , जिल्हा सदस्य विशाल इंगोले, प्रकाश इंगोले, आनंद शिरसाट जेष्ठ सल्लागार मधूकर मांजरमकर या प्रमाणे कार्यकारणी गठीत करण्यात आली.

या बैठकीत अनेक स्थानिक पत्रकार तसेच समाजसेवक उपस्थित होते, ज्यांनी सरदार यांच्या विचारांना समर्थन देतेंदर्गत विचारमंथन केले. कार्यकारिणीच्या निवडीनंतर उपस्थित सदस्यांनी एकत्र येऊन संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी कटिबद्धता दर्शवली.

आंबेडकरी व्हॉईस मिडिया फोरमने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, जेणेकरून स्थानिक पत्रकारितेत सकारात्मक बदल घडवता येईल आणि पत्रकारांच्या हक्कांची सुरक्षा सुनिश्चित करता येईल. संघटनेच्या कार्यान्वयनाने समाजात न्याय व समानतेच्या मूल्यांना स्थान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. सर्व कार्यकरणीचे केंद्रीय व राज्य कार्यकारणींने अभिनंदन केले.बैठकीचे सुत्रसंचलन प्रा. यू. एच. बलखंडे यांनी तर आभार अरुण दिपके यांनी मानले.

Related posts

तलाठी पदभरती: उमेदवारांसाठी जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन; अडचण आल्यास कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन

Santosh Awchar

भारतीय प्रजासत्ताक दिन : पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण

Santosh Awchar

औंढा नागनाथ येथील घरफोडीतील आरोपी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 2 लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Santosh Awchar

Leave a Comment