हिंगोली : संतोष अवचार
येथील बस स्थानकाकडून शासनाच्या आदेशानुसार आगाराकडे असलेल्या बहुतांश बसेस आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा अंतर्गत प्रवासी वाहतुकीचे व मानव विकास चे तीन तेरा झाले आहेत. अनेक विद्यार्थिनींना आज 11 जुलै सोमवार रोजी शाळा-महाविद्यालयात येता आले नाही.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या हिंगोली आजारास एकूण 34 गाड्या उपलब्ध आहेत. या गाड्यांवर सध्या आगाराची भिस्त असून जिल्हा अंतर्गत तसेच लांब पल्ल्याच्या गाड्याही सोडल्या जातात मानव विकासच्या एकूण एकवीस बसेस असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील बहुतांशी मानव विकास बसेस सह आगारातील बहुतांश बसेस आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे रवाना करण्यात आलेले आहेत. आगाराला यंदा 34 बसेस पाठविण्याचे टार्गेट देण्यात आले होते. ते आगाराने पेलले असून 30 गाड्या पाठवून देण्यात आलेले आहेत. 10 जुलै रोजी आषाढी एकादशी झाल्यानंतर तेथून रात्री सहा गाड्या परतले असून सध्या आगाराकडे दहा ते बारा बसेस असल्याची माहिती एटीएस पुंडगे यांनी दिली आहे. त्यातीलही आठ ते दहा गाड्या पुन्हा पंढरपूर कडे आजच सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे आगाराकडे जेमतेम दोनच गाड्या शिल्लक राहतात या दोन गाड्यांमध्ये जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक व मानवविकास अवलंबून राहणार आहे.
एकंदरीत गाड्यांची अपुरी संख्या पाहता जिल्हा अंतर्गत प्रवासी वाहतूक कोलमडली असून लांब पल्ल्याच्या गाड्या ही बंद आहेत तर मानवी का सच्चा बसेसही बंद राहणार आहेत. सध्या केवळ औरंगाबाद पुणे कडे एक बस धावत असून नांदेड, परभणी साठी स्लीपर कोच सोडण्यात आलेली आहे, अशी माहितीही एटीएस पुंडगे यांनी दिली आहे.