Marmik
हिंगोली कानोसा

हिंगोलीत आष्टीकर आघाडीवर तर जालन्यात दानवे, पंकजा मुंडे पिछाडीवर

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / विशेष प्रतिनिधी :-

हिंगोली – लोकसभा निवडणुकीचा निकाल आज 4 जून रोजी जाहीर होत आहे. दुपारपर्यंत हिंगोली लोकसभा निवडणुकीत नागेश पाटील अष्टीकर यांना एक लाख 82 हजार 144 एवढी मते पडली. तर बाबुराव कदम कोहळीकर यांना एक लाख 42 हजार 395 एवढी मते पडली आहेत. कोहळीकर हे 30 हजार 09 मतांनी पिछाडीवर आहेत. जालन्यात धक्कादायक चित्र असून कल्याण काळे यांना लाख 79 हजार 316 एवढी मते पडले असून रावसाहेब दानवे 7369 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांना एक लाख 71 हजार 947 एवढी मते पडली आहेत.

मराठवाड्यातील बीड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बजरंग सोनवणे हे 1394 मतांनी आघाडीवर असून त्यांना एक लाख १९२३८ एवढी मते पडली आहेत. तर पंकजा मुंडे यांना एक लाख 17 हजार 844 एवढी मते पडली आहेत.

लातूर लोकसभेत काँग्रेसचे डॉ. शिवाजी कोळगे यांना दोन लाख वीस हजार 450 एवढी मते पडली असून बीजेपी चे सुधाकर श्रांगरे यांना एक लाख 96 हजार 538 एवढी मते पडली आहेत. काळगे हे 23 हजार 912 मतांनी आघाडीवर आहेत.

नांदेड लोकसभेत वसंतराव चव्हाण हे एक लाख 67 हजार 149 एवढी मते पडली असून ते 14 हजार तीनशे नऊ मतांनी आघाडीवर आहेत. परभणी येथून शिवसेनेचे संजय जाधव यांना एक लाख 71 हजार 215 एवढी मते पडली असून बीजेपी चे महादेव जानकर यांना 1,33,417 एवढी मते पडली आहेत.

जाधव हे 37 हजार 798 एवढ्या मतांनी लीडवर आहेत. उस्मानाबाद येथे ओमप्रकाश निंबाळकर हे तीन लाख 39 हजार 686 एवढी मते पडली आहेत. त्यांना एक लाख 46 हजार 117 एवढ्या मतांची लीड मिळाली आहे.

छत्रपती संभाजी नगर येथून संदिपान भुमरे यांना एक लाख 73 हजार 700 एवढी मते पडली असून त्यांनी वीस हजार 914 मतांची लीड घेतली आहे.

Related posts

महायुतीत फूट? रामदास पाटलांनीही भरला उमेदवारी अर्ज!

Gajanan Jogdand

पाटलांचे ‘रामदासी’ ‘कवित्व’, निवडणुकीचा कंडू शमला!

Gajanan Jogdand

हिंगोली लोकसभा: भाजपचा उमेदवार कोण?

Gajanan Jogdand

Leave a Comment