Marmik
Hingoli live क्राईम

कळमनुरीतील आठवडी बाजार गल्ली व जटाळवाडी येथील हातभट्टी दारू निर्मिती उध्वस्त! कळमनुरी पोलिसांची कार्यवाही

मार्मिक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क / संतोष अवचार :-

हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी शहरातील आठवडी बाजार गल्ली व कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी येथे सुरू असलेली हातभट्टी दारू निर्मिती कळमनुरी पोलिसांनी 26 मार्च रोजी छापा टाकून उध्वस्त केले. याप्रकरणी संबंधितावर कळमनुरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोली चे डॅशिंग पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात लपून छपून चालणारे अवैध धंद्या विरोधात विशेष मोहीम व कठोर कार्यवाही सुरू आहे. तसेच सतत असे अवैध धंद्याचे गुन्हे करणाऱ्या आरोपी विरोधात प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही देखील केली जात आहे.

26 मार्च रोजी कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीत कळमनुरी शहरातील आठवडी बाजार गल्लीत व तालुक्यातील जटाळवाडी येथे कळमनुरी पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करणे व विक्री करण्याच्या ठिकाणी छापा मारून दोन्ही ठिकाणावरून एकूण 28 हजार 600 रुपयांची हातभट्टी दारू जप्त केली. सदर ठिकाणी हातभट्टी दारू बनवण्यासाठी वापरात येणारे साहित्य व मिश्रण जागेवरच नष्ट केले.

नमूद दोन्ही ठिकाणच्या कार्यवाही प्रकरणी संबंधित व्यक्तींवर कळमनुरी पोलीस ठाणे येथे भादविच्या विविध कलमान्वय तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही हिंगोली चे डॅशिंग पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा शहारे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सोनवणे, सहाय्यक फौजदार अंभोरे, पोलीस अंमलदार संजय राठोड, प्रशांत शिंदे यांनी केली.

Related posts

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच वार्षिक सरासरीच्या 55 टक्के पाऊस

Gajanan Jogdand

उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्यासह सेवानिवृत्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा निरोप समारंभ

Gajanan Jogdand

असहाय वयोवृद्ध व्यक्तीच्या मदतीला धावले हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यतत्पर पोलीस अधीक्षक; उपचार करून वयोवृद्ध व्यक्तीस त्याच्या गावी पाठविले

Gajanan Jogdand

Leave a Comment